Join us

‘दृश्यम २’फेम इशिता दत्तानं मुंबईत खरेदी केलं नवीन घर, या अभिनेत्याचे बनले शेजारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2023 20:07 IST

Ishita Dutta: ‘दृश्यम’ फेम अभिनेत्री इशिता दत्ताने तिचे ड्रीम होम खरेदी केले आहे.

‘दृश्यम’ फेम अभिनेत्री इशिता दत्ता(Ishita Dutta)ने तिचे ड्रीम होम खरेदी केले आहे. यावर्षी इशिता ‘दृश्यम २’ (Drishyam 2) या चित्रपटात पाहायला मिळाली. या चित्रपटात तिने अजय देवगणच्या मुलीची भूमिका साकारली होती. इशिता सोशल मीडियावर सक्रिय असून ती या माध्यमातून  चाहत्यांच्या संपर्कात असते. तिने नुकतीच नवीन घर घेतल्याची बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे.

इशिता दत्ता आणि तिचा पती वत्सल शेठ याने त्याचा इन्स्टाग्राम अकाउंटवरून या नवीन घराचे फोटो शेअर केले आहेत. या घराचे काम अजून सुरू असले तरी या दोघांच्याही चेहऱ्यावर नवीन घर घेतल्याचा आनंद दिसत आहे. हे फोटो शेअर करत त्यांनी लिहिलं, नवीन वर्ष, नवीन प्रोजेक्ट. आमचं ड्रीम होम. या फोटोंवर चाहते भरभरून कमेंट्स करत त्यांना अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत आहेत.

मीडिया रिपोर्ट्स नुसार, इशिताचं हे नवीन घर जुहू सर्कलच्या जवळ आहे. तिचा हा फ्लॅट तीन बीएचकेचा आहे. वत्सलला अनेक वर्षांपासून मुंबईत स्वतःचे घर घ्यायचे होते, आता त्याचे हे स्वप्न पूर्ण झाले आहे, असे इशिताने सांगितले. 

इशिता दत्ता आणि वत्सल सेठ हे कुशल टंडनचे शेजारी बनले आहेत. कुशल टंडनने इशिता आणि वत्सल यांना त्यांच्या नवीन घरासाठी शुभेच्छा दिल्या आणि लिहिले, 'वेलकम शेजारी.' अलीकडेच इशिता आणि वत्सल सेठने अजय देवगण आणि काजोलसोबत नवीन वर्ष साजरे केले. त्याने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत.

टॅग्स :दृश्यम 2