२००८ मध्ये बॉक्सआॅफिसवर गाजलेल्या ‘दोस्ताना’ या चित्रपटाचा सीक्वल अर्थात ‘दोस्ताना 2’ येणार, अशी चर्चा पुन्हा जोरात सुरु आहे. प्रियांका चोप्रा, जॉन अब्राहम, अभिषेक बच्चन स्टारर या चित्रपटाला तरूणाईने डोक्यावर घेतले होते. उण्यापु-या ११ वर्षानंतर या चित्रपटाचा सीक्वल येणार, अशी चर्चा जोरात आहे. ताजी खबर खरी मानाल तर या चर्चेत दम आहे. होय, ‘दोस्ताना’चा निर्माता करण जोहर याने खुद्द हा खुलासा केला आहे. ‘दोस्ताना 2’संदर्भात काही विचार व कल्पनांवर काम सुरु आहे. अर्थात अद्याप अधिकृतपणे काम सुरु झालेले नाही. या चित्रपटासाठी अद्याप कुणाशीही संपर्क साधण्यात आलेला नाही, असे करणने स्पष्ट केले आहे.
ठरले! ‘दोस्ताना 2’ येणार; करण जोहरने केला मोठ्ठा खुलासा!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2019 11:36 IST
‘दोस्ताना’ या चित्रपटाचा सीक्वल अर्थात ‘दोस्ताना 2’ येणार, अशी चर्चा पुन्हा जोरात सुरु आहे आणि या चर्चेत दम आहे.
ठरले! ‘दोस्ताना 2’ येणार; करण जोहरने केला मोठ्ठा खुलासा!!
ठळक मुद्दे‘दोस्ताना’ हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर खूपच गाजला होता. जॉन अब्राहमच्या या चित्रपटातील एका सीनची तर प्रचंड चर्चा झाली होती.