Join us
Daily Top 2Weekly Top 5

एका मुलाची आई असल्याचे युजर्स करुन देतायेत मलायकाला आठवण, वाचा काय आहे नेमके कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2021 19:38 IST

काहींनी तर मलायकाला कशा पद्धतीचे कपडे तिने घातले पाहिजेत याचा सल्लाही दिला आहे. एका चाहत्याने लिहिले की, 'तू अंगप्रदर्शन होईल असे कपडे घालू नकोस. तू एक बाई आणि मुलाची आई आहेस.

स्टायलिश दिसण्याच्या नादात मलायकाने केल्या सगळ्याच हद्द पार केल्याचे नेटीझन्सचे म्हणणे आहे, म्हणूनच नवीन फोटो पाहून नेहमीच कौतुक करणारे नेटीझन्स यावेळी मात्र तिच्यावर संताप व्यक्त करताना दिसत आहेत. मलायकाने हे फोटो जेव्हा सोशल मीडियावर शेअर केले तेव्हा नेटकऱ्यांनी तिला अनेक गोष्टी सुनावायला सुरुवात केल्या.

काहींनी तर मलायकाला कशा पद्धतीचे कपडे तिने घातले पाहिजेत याचा सल्लाही दिला आहे. एका चाहत्याने लिहिले की, 'तू अंगप्रदर्शन होईल असे कपडे घालू नकोस. तू एक बाई आणि मुलाची आई आहेस. 

गर्दी पाहून संतापली मलायका अरोरा, विचारले कोरोनाचा धोका कमी झाला का?

आपल्या शरीराचा आदर कर आणि कोणालाही काहीही बोलण्याची संधी देऊ नकोस मात्र अशा कमेंट करणा-यांचा फरक पडणार ती मलायका कसली. अनेकदा तिला तिच्या ड्रेसिंग स्टाइलमुळे ट्रोल केले गेले आहे. त्यामुळे तिला ट्रोल करणारेही ट्रोल करणे थांबवत नाही आणि मलायकाही वेळीच उत्तर देत बोलती बंद करते. 

मलायकाने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला असून कोरोनाचा धोका संपलाय का असे या फोटोद्वारे तिने विचारले आहे. हा फोटो वांद्रे येथील बँडस्टँड परिसरातील असून लोकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी तिथे असल्याचे या फोटोवरून आपल्याला दिसून येत आहे.मलायकाला देखील काही महिन्यांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. मलायकाने स्वत: तिचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्याची माहिती सोशल मीडियावर शेअर केली होती. मला कोरोनाची लागण झाली असून प्रोटोकॉलअंतर्गत मी सेल्फ आयसोलेशनमध्ये असल्याचे मलायकाने सोशल मीडियाद्वारे तिच्या चाहत्यांना सांगितले होते.

व्हॅलेन्टाईन वीकमध्ये कोणाला पाहून लाजली मलायका अरोरा, म्हणाली...

बॉलिवूडचे लव्ह बर्ड्स मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांनी अगदी खुल्लमखुल्ला जगासमोर आपले नाते मान्य केले आणि तेव्हापासून दोघांच्याही प्रेमाला उधाण आले. प्रेम व्यक्त करण्याची एकही संधी मलायका व अर्जुन सोडत नाहीत. लोक काय म्हणतील, याची पर्वा न करता दोघेही एकमेकांवरचे प्रेम व्यक्त करतात. सोशल मीडियावर एकमेकांच्या फोटोवर कमेंट करतात. आता मलायकाने एक फोटो शेअर केला आहे आणि हा फोटो पाहून चाहत्यांनी या फोटोचे अर्जुन कपूरसोबत असलेले कनेक्शन शोधून काढलेय. हा फोटो आणि या फोटोसोबतचे कॅप्शन अर्जुनसाठी आहे, हे कळायला चाहत्यांना वेळ लागला नाही. 

टॅग्स :मलायका अरोराअरबाज खान