गर्दी पाहून संतापली मलायका अरोरा, विचारले कोरोनाचा धोका कमी झाला का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 05:52 PM2021-02-09T17:52:22+5:302021-02-09T17:54:55+5:30

मलायकाने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला असून कोरोनाचा धोका संपलाय का असे या फोटोद्वारे तिने विचारले आहे.

Malaika Arora wonders if Covid-19 crisis has ended, shares pic of huge crowds at Bandstand | गर्दी पाहून संतापली मलायका अरोरा, विचारले कोरोनाचा धोका कमी झाला का?

गर्दी पाहून संतापली मलायका अरोरा, विचारले कोरोनाचा धोका कमी झाला का?

googlenewsNext
ठळक मुद्देहा फोटो वांद्रे येथील बँडस्टँड परिसरातील असून लोकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी तिथे असल्याचे या फोटोवरून आपल्याला दिसून येत आहे.

कोरोनाच्या रुग्णसंख्येत गेल्या काही दिवसांत चांगलीच घट झाली आहे. पण असे असले तरी रुग्णांची संख्या काही पूर्ण कमी झालेली नाही. त्यामुळे लोकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. सार्वजनिक ठिकाणी लोकांनी गर्दी करू नये, तसेच सार्वजनिक ठिकाणी असताना एकमेकांमध्ये अंतर ठेवावे, मास्क लावावा अशा राज्य आणि केंद्र सरकाराकडून सतत सुचना दिल्या जात आहेत. पण या सुचनांचे पालन लोक करताना दिसत नाहीयेत. अनेक ठिकाणी लोक गर्दी करताना दिसत आहेत. त्यामुळे आता अभिनेत्री मलायका अरोरा देखील संतापली आहे.

मलायकाने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला असून कोरोनाचा धोका संपलाय का असे या फोटोद्वारे तिने विचारले आहे. हा फोटो वांद्रे येथील बँडस्टँड परिसरातील असून लोकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी तिथे असल्याचे या फोटोवरून आपल्याला दिसून येत आहे. 

मलायकाला देखील काही महिन्यांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. मलायकाने स्वत: तिचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्याची माहिती सोशल मीडियावर शेअर केली होती. मला कोरोनाची लागण झाली असून प्रोटोकॉलअंतर्गत मी सेल्फ आयसोलेशनमध्ये असल्याचे मलायकाने सोशल मीडियाद्वारे तिच्या चाहत्यांना सांगितले होते.

Web Title: Malaika Arora wonders if Covid-19 crisis has ended, shares pic of huge crowds at Bandstand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.