Join us
Daily Top 2Weekly Top 5

क्रिती सनॉनच्या दुहेरी भूमिकेने सजलेला अन् काजोलच्या अभिनयाने रंगलेला 'दो पत्ती'चा ट्रेलर बघाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2024 15:45 IST

क्रिती सनॉन आणि काजोलच्या अभिनयाची जुगलबंदी असलेला दो पत्तीचा उत्कंठावर्धक ट्रेलर व्हायरल (do patti)

गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेत्री क्रिती सनॉन आणि अभिनेत्री काजोल यांच्या आगामी 'दो पत्ती' सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे.  काही महिन्यांपूर्वी या सिनेमाचा टीझरला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आता नुकतंच 'दो पत्ती'चा ट्रेलर भेटीला आलाय. ट्रेलर भन्नाट आहेच यात शंका नाही. पण ट्रेलरमध्ये अभिनेत्री क्रिती सनॉनबद्दल एक सुखद धक्का मिळतो. कारण क्रिती या सिनेमात जुळ्या बहिणींची भूमिका साकारणार आहे. याशिवाय तिच्या जोडीला काजोल असल्याने 'दो पत्ती'चा ट्रेलर उत्कंठावर्धक ठरलाय.

'दो पत्ती'चा ट्रेलर

'दो पत्ती'च्या ट्रेलरच्या सुरुवातीला काजोल एका माणसाची चौकशी करताना दिसते. काजोल त्या व्यक्तीला विविध प्रश्न विचारताना दिसते. पुढे ट्रेलरमध्ये क्रितीची एन्ट्री होते. क्रिती त्या व्यक्तीसोबत बर्फाळ प्रदेशात फिरताना दिसते. तिथे काहीतरी घडताना दिसतं. पुढे ट्रेलरमध्ये अचानक क्रितीच्या जुळ्या बहिणीची एन्ट्री होते. क्रितीची जुळी बहीण स्वभावाने विचित्र असलेली दिसते. ती बहिणीच्या होणाऱ्या नवऱ्यासोबत फ्लर्ट करताना दिसते. पुढे अनेक गुपितं ट्रेलरमध्ये दिसतात. या रहस्यांची उकल करण्याची जबाबदारी काजोलकडे असते.

क्रिती-काजोलच्या अभिनयाची जुगलबंदी

एकूणच 'दो पत्ती'मध्ये क्रिती-काजोलच्या अभिनयाची जुगलबंदी दिसते. जुळ्या बहिणींची भूमिका साकारत असल्याने क्रितीचा जबरदस्त अभिनय बघायला मिळतोय. तर पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत काजोल भाव खाताना दिसते. क्रिती-काजोल या दोघींना एकाच सिनेमात बघायला त्यांचे चाहते नक्कीच उत्सुक असतील यात शंका नाही. हा सिनेमा २५ ऑक्टोबरला नेटफ्लिक्स या ओटीटीवर रिलीज करण्यात आलाय.

टॅग्स :क्रिती सनॉनकाजोलबॉलिवूड