सलमान खानचे चाहते गेल्या अनेक दिवसांपासून ‘भारत’ या चित्रपटाच्या टीजरकडे डोळे लावून बसले होते. आज भाईजानने आपल्या चाहत्यांना प्रजासत्ताक दिनाची भेट देत, ‘भारत’चा टीजर जारी केला. यातील सलमानचा दमदार अॅक्शन अवतार पाहण्यासारखा आहे. या टीजरमध्ये सलमान पाच वेगवेगळ्या लूकमध्ये दिसतोय. त्याचे हे पाचही लूक चाहत्यांसाठी सरप्राईजिंग आहेत, हे सांगायला नकोच.गेल्या अनेक महिन्यांपासून या चित्रपटाचे शूटींग सुरु आहे. अली अब्बासने दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात सलमानसोबत कॅटरिना कैफ मुख्य भूमिकेत आहेत. टीजरमध्ये तिची झलक पाहायला मिळेल, अशी अपेक्षा होती. पण टीजरमध्ये कॅटरिना नाही. सगळा फोकस फक्त आणि फक्त सलमानवर आहे. यावर्षी ईदच्या मुहूर्ताला रिलीज होणा-या या चित्रपटाचा हा दमदार टीजर भाईजानच्या चाहत्यांनी तरी मिस करायला नको. तेव्हा पाहा आणि कसा वाटला ते नक्की कळवा...
“Don't Miss It! सलमान खानने चाहत्यांना दिली प्रजासत्ताक दिनाची भेट; ‘भारत’चा टीजर रिलीज!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2019 11:51 IST
सलमान खानचे चाहते गेल्या अनेक दिवसांपासून ‘भारत’ या चित्रपटाच्या टीजरकडे डोळे लावून बसले होते. आज भाईजानने आपल्या चाहत्यांना प्रजासत्ताक दिनाची भेट देत, ‘भारत’चा टीजर जारी केला.
“Don't Miss It! सलमान खानने चाहत्यांना दिली प्रजासत्ताक दिनाची भेट; ‘भारत’चा टीजर रिलीज!!
ठळक मुद्देया टीजरमध्ये सलमान पाच वेगवेगळ्या लूकमध्ये दिसतोय. त्याचे हे पाचही लूक चाहत्यांसाठी सरप्राईजिंग आहेत, हे सांगायला नकोच.