Join us
Daily Top 2Weekly Top 5

सिनेमातली हिरोईन बडे स्टार्स ठरवतात? 'डंकी'चं उदाहरण देत तापसी पन्नू स्पष्टच म्हणाली, "शाहरुख सरांची..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2026 12:51 IST

आपल्या परखड मतांसाठी ओळखली जाणारी बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. बॉलिवूडमधील अंतर्गत राजकारण आणि कास्टिंग प्रक्रियेवर तापसीने मोठा खुलासा केला आहे.

आपल्या परखड मतांसाठी ओळखली जाणारी बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. बॉलिवूडमधील अंतर्गत राजकारण आणि कास्टिंग प्रक्रियेवर तापसीने मोठा खुलासा केला असून, मोठ्या चित्रपटांमध्ये अभिनेत्रींची निवड कशी केली जाते, याचे वास्तव तिने मांडले आहे. "मोठ्या व्यावसायिक चित्रपटांमध्ये अभिनेत्री कोण असेल, हे अनेकदा त्या चित्रपटाचा हिरोच ठरवतो," असे खळबळजनक विधान तापसीने केले आहे.

तुला कधी तुझ्या परखड स्वभावामुळे निर्मात्यांनी बाहेरचा रस्ता दाखवला आहे का? असा प्रश्न तापसीला अलीकडेच एका मुलाखतीत विचारण्यात आला. यावर तापसी म्हणाली, “खरं सांगायचं तर, मला याबद्दल थेटपणे काहीच माहित नसतं. कदाचित काही गोष्टी नंतर कानावर पडतात, पण सत्य कधीच तुमच्यापर्यंत पोहोचू दिलं जात नाही. कोणीतरी सहज म्हणून जातं, ‘नाही, मला त्यांच्यासोबत काम करायचं नाहीये,’ पण त्यामागचं नेमकं कारण तुम्हाला कधीच कळत नाही. मला जे काही समजलंय ते फक्त इतकंच की, कधीकधी हिरोलाच तुम्ही चित्रपटात असावं असं वाटत नसतं.''

''मला वाटतं हे सर्वांनाच ठाऊक आहे की, बहुतेक वेळा हिरोच ठरवतो की त्याच्या चित्रपटाची हिरोईन कोण असेल. अपवाद फक्त मोठ्या दिग्दर्शकांचा असतो, कारण काही दिग्दर्शक हे स्वतःच मोठे स्टार्स असतात.”

शाहरुख खानच्या 'डंकी' चित्रपटाचे उदाहरण देत तापसी पुढे म्हणाली— “जेव्हा राजू सरांना (राजकुमार हिरानी) मी चित्रपटात हवे होते, तेव्हाच मी त्या चित्रपटाचा भाग बनले. कदाचित सर्वांसाठीच हा एक मोठा धक्का होता, कारण मी ज्या प्रकारच्या चित्रपटांमध्ये काम करते किंवा शाहरुख सरांची ऑनस्क्रीन जोडी ज्या अभिनेत्रींसोबत जमली आहे त्या ठराविक वर्तुळात मी कधीच नव्हते. पण हे शक्य झालं कारण दिग्दर्शकाला पूर्ण खात्री होती की त्यांना मलाच कास्ट करायचं आहे.”, अशाप्रकारे तापसीने खुलासा केला. तापसीचा नुकताच 'अस्सी' हा सिनेमा रिलीज झाला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Hero decides heroine? Taapsee Pannu reveals truth with 'Dunki' example.

Web Summary : Taapsee Pannu claims heroes often decide heroines in big films, except with top directors. She cited 'Dunki,' saying Rajkumar Hirani chose her despite not fitting typical pairings. Her film 'Assi' recently released.
टॅग्स :डंकी' चित्रपटतापसी पन्नूशाहरुख खानराजकुमार हिरानीबॉलिवूड