पंजाबी गायक तलविंदर आणि अभिनेत्री दिशा पाटनी पुन्हा एकत्र दिसले आहेत. काही दिवसांपूर्वी क्रिती सनॉनची बहीण नुपूर सनॉनच्या लग्नात दोघं पहिल्यांदा एकत्र दिसले. तेव्हापासूनच त्यांच्य रिलेशनशिपच्या चर्चा सुरु झाल्या. तर आता नुकतंच रविवारी मुंबईतील 'लोलापालूजा इंडिया' (Lollapalooza India) इव्हेंटमध्ये दोघेही एकमेकांचा हात धरून फिरताना दिसले दिशा आणि तलविंदरला अशा प्रकारे उघडपणे एकत्र पाहून सोशल मीडियावर त्यांचे व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाले आहेत.
लोलापलूजा इंडिया मोठा जागतिक संगीत महोत्सव आहे. याच इव्हेंटमध्ये तलविंदरसोबत दिशा पाटनी दिसल्याने दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चांना पुन्हा सुरुवात झाली आहे. इव्हेंटमध्ये तलविंदरच्या चेहऱ्यावर मास्क आहे. नेहमीप्रमाणे त्याने चेहरा लपवला आहे आणि तो कॅज्युअल लूकमध्ये दिसत आहे. तर दिशा पाटनीने ऑफ शोल्डर व्हाईट क्रॉप टॉप आणि ब्लू जीन्स घातली आहे. विशेष म्हणजे दोघंही हातात हात घालून हसत फिरत आहेत. दोघं एकमेकांसोबत खूप आनंदीही दिसत आहेत. या व्हिडीओतून त्यांनी रिलेशनशिप जगजाहीर केल्याचीही चर्चा आहे.
कोण आहे तलविंदर?
तलविंदर सिंग सिद्धू हा गायक आहे ज्याला 'तलविंदर' नावाने ओळखलं जातं. तो एक लोकप्रिय पंजाबी गायक, गीतकार आणि संगीत निर्माता आहे. आजच्या काळात पंजाबी संगीतातील सर्वाधिक स्ट्रीम केल्या जाणाऱ्या स्वतंत्र कलाकारांपैकी तो एक आहे. त्याचा जन्म १९९७ चा असून त्याने अमेरिकेत शिक्षण घेतलं. त्याचे संगीत पंजाबी लोककला आणि हिप-हॉप, R&B, ट्रॅप व सिंथ-पॉप यांसारख्या जागतिक शैलींचे मिश्रण आहे. तलविंदर अनेकदा चेहऱ्यावर पेंट करून सादरीकरण करतो. त्याच्या मत यामुळे त्याला त्याचे खाजगी आयुष्य आणि सार्वजनिक प्रतिमा वेगळी ठेवण्यास मदत होते.
तलविंदरने अनेक मोठ्या लाईव्ह इव्हेंट्समध्ये परफॉर्म केले आहे. त्याने दुआ लिपा आणि जी-इझी सारख्या आंतरराष्ट्रीय कलाकारांच्या शोमध्ये ओपनिंग परफॉर्मन्स दिला आहे आणि आता तो 'लोलापालूजा इंडिया २०२६' मध्येही दिसला.
Web Summary : Disha Patani and Punjabi singer Talwiinder were seen holding hands at Lollapalooza India, sparking relationship rumors. They previously appeared together at Kriti Sanon's sister's wedding. Talwiinder, known for his unique blend of Punjabi folk and global music styles, often performs with his face painted.
Web Summary : दिशा पटानी और पंजाबी गायक तलविंदर को लोलपालूजा इंडिया में हाथ पकड़े देखा गया, जिससे उनके रिश्ते की अफवाहें तेज हो गईं। वे पहले कृति सैनन की बहन की शादी में एक साथ दिखे थे। तलविंदर पंजाबी लोक और वैश्विक संगीत शैलियों के मिश्रण के लिए जाने जाते हैं।