Join us
Daily Top 2Weekly Top 5

'द डर्टी पिक्चर' मध्ये काम करणारी अभिनेत्री आर्या बॅनर्जीचा संशयास्पद मृत्यू, फ्लॅटवर आढळला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2020 08:56 IST

आर्या बॅनर्जीचा मृतहेद दक्षिण कोलकाताच्या जोधपूर पार्कमधील तिच्या फ्लॅटमध्ये आढळून आला. यावेळी तिचा मृतदेह रक्ताने माखलेला होता.

'द डर्टी पिक्चर' आणि 'लव सेक्स और धोखा' सारख्या गाजलेल्या सिनेमांमध्ये दिसलेली अभिनेत्री आर्या बॅनर्जीचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे आढळून आले आहे. पोलीस सध्या याचा तपास करत आहेत. आर्या बॅनर्जीचा मृतहेद दक्षिण कोलकाताच्या जोधपूर पार्कमधील तिच्या फ्लॅटमध्ये आढळून आला. यावेळी तिचा मृतदेह रक्ताने माखलेला होता.

असेही सांगितले जात आहे की, कामावाली बाई कामासाठी घरी आली होी. पण अनेकदा फोन करूनही आर्याने काहीच उत्तर दिलं नाही. त्यामुळे संशय आल्याने कामवाली बाई पोलीस स्टेशनला गेली आणि या घटनेची माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच पोलीस तिच्या फ्लॅटवर पोहोचले. तेव्हा आर्या बॅनर्जीचा फ्लॅट आतून बंद होता. पोलीस फ्लॅटचा दरवाजा तोडून आता गेले. तेव्हा त्यांना बेडवर आर्याचा रक्ताने माखलेला मृतदेह आढळून आला. तिच्या नाकातून रक्त वाहत होतं आणि तिला उलटीही झालेली होती.

अभिनेत्री आर्या बॅनर्जी खरं नाव देवदत्ता बॅनर्जी होतं. ती प्रसिद्ध सितार वादक पंडित निखील बॅनर्जी यांची सर्वात लहान मुलगी होती. तिने 'लव सेक्स और धोखा' सिनेमातून डेब्यू केलं होतं. तसेच ती 'द डर्टी पिक्चर' सिनेमातही दिसली होती. 

 

टॅग्स :बॉलिवूडमृत्यू