बॉलिवूडला एकाहून एक सरस सिनेमा देणारे प्रसिद्ध दिग्दर्शक म्हणजे संजय लीला भन्साळी (sanjay leela bhansali). 'खामोशी' सिनेमापासून त्यांनी त्यांच्या दिग्दर्शकीय करिअरची सुरुवात केली. त्यानंतर 'देवदास','हम दिल दे चुके सनम', 'गुजारिश', 'रामलीला', 'बाजीराव मस्तानी','ब्लॅक' अशा एकापेक्षा एक सुपरहिट सिनेमांचं त्यांनी दिग्दर्शन, निर्मिती केली आहे. प्रोफेशनल लाइफमुळे चर्चेत येणाऱ्या भन्साळींची पर्सनल लाइफ सुद्धा तितकीच रंजक आहे.
लव्हस्टोरीवर आधारित सिनेमा तयार करणाऱ्या भन्साळी यांची खऱ्या आयुष्यातील लव्हस्टोरी मात्र अपूर्णच राहिली. संजय भन्साळी एका प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिकेच्या प्रेमात होते. मात्र, या जोडीचं लग्न काही होऊ शकलं नाही. त्यामुळे अद्यापही ते अविवाहित आहेत.
संजय लीला भन्साळी ज्या तरुणीवर प्रेम करायचे ती तरुणी म्हणजे प्रसिद्ध कोरिओग्राफर वैभवी मर्चंट. 'हम दिल दे चुके सनम'मधील 'ढोली तारो ढोल बाजे' या गाण्याची कोरिओग्राफर वैभवी मर्चंटने केली होती. विशेष म्हणजे भन्साळींच्या या सिनेमातून तिने तिच्या करिअरची सुरुवात केली होती. या सिनेमाच्या सेटवरच वैभवी आणि संजय भन्साळी यांच्यात मैत्री झाली. आणि, त्या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं.
२००७ साली आलेल्या 'सांवरिया' सिनेमावेळी संजय आणि वैभवी यांनी साखरपुडा केला होता. इतकंच नाही तर ते लग्नदेखील करणार होते. मात्र, ऐनवेळी त्यांचं बिनसलं. एका मुलाखतीमध्ये वैभवीने यावर भाष्य केलं होतं. ''आम्ही आजही खूप चांगले मित्र आहोत. पण मी खूप लाजाळू आहे त्यामुळे मला सार्वजनिक ठिकाणी बॉयफ्रेंडच्या हातात हात घालून फिरायला जमत नाही. असं वागणं म्हणजे मला दिखावा केल्यासारखं वाटतं. आमच्या दोघांमध्ये काही तरी केमिस्ट्री असेल असं आम्हाला वाटलं होतं. पण, तसं काहीच झालं नाही.''
Web Summary : Sanjay Leela Bhansali, known for his blockbuster films, had an unfulfilled love story with choreographer Vaibhavi Merchant. They met on the set of 'Hum Dil De Chuke Sanam' and even got engaged, but eventually called it off, remaining good friends.
Web Summary : ब्लॉकबस्टर फिल्मों के लिए जाने जाने वाले संजय लीला भंसाली का कोरियोग्राफर वैभवी मर्चेंट के साथ एक अधूरा प्रेम कहानी थी। वे 'हम दिल दे चुके सनम' के सेट पर मिले और सगाई भी कर ली, लेकिन आखिरकार इसे रद्द कर दिया, और अच्छे दोस्त बने रहे।