Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘पंगा’च्या दिग्दर्शिकेने घेतला कंगना राणौतच्या ‘या’ स्वभावाचा धसका! वाचा, इंटरेस्टिंग बातमी!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2018 13:14 IST

कंगनासोबत काम करणाऱ्या किंवा करू इच्छिणा-यांनी चांगलाच धसका घेतल्याचे दिसतेय. ताजी बातमी तरी हेच दर्शवणारी आहे. 

कंगना राणौतचा‘मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी’ हा चित्रपट चर्चेत आहे, अगदी तशीच कंगनाही चर्चेत आहे. ‘मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी’च्या दिग्दर्शकाने चित्रपट सोडला आणि पुढे कंगनानेच दिग्दर्शनाची सूत्रे आपल्या हाती घेतली. पुढे सोनू सूदनेही कंगनाच्या उर्मट वागण्याने हा चित्रपट सोडल्याचा एक अंक गाजला. हा सगळा वाद बॉलिवूड इंडस्ट्रीत चवीने चर्चिला जात असताना कंगना मात्र नेहमीप्रमाणे बेपर्वा आहे. पण कंगनासोबत काम करणाऱ्या किंवा करू इच्छिणा-यांनी मात्र यापासून चांगलाच धसका घेतल्याचे दिसतेय. ताजी बातमी तरी हेच दर्शवणारी आहे. होय, ‘मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी’नंतर कंगना दिग्दर्शिका अश्विनी अय्यर तिवारीसोबत काम करणार आहे. 

अश्विनीचा ‘पंगा’ हा चित्रपट कंगनाने साईन केला आहे. पण कदाचित कंगनाच्या चित्रपटात लुडबूड करण्याच्या स्वभावाचा अश्विनीने धसका घेतला आहे. ताजी बातमी मानाल तर कंगनाची लुडबूड टाळण्यासाठी अश्विनी कंगनाकडून एक विशेष करार साईन करून घेऊ शकते. बॉलिवूड हंगामाने दिलेल्या वृत्तानुसार, ‘पंगा’चे शूटींग सुरू होण्यापूर्वी अश्विनी कंगनाकडून एक करार साईन करून घेणार आहे. हा करार म्हणजे ‘no interference contract’. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कंगना व अश्विनीत अनेक बैठका झाल्यात. कंगना या चित्रपटातील भूमिकेला पूरेपूर न्याय देईल, असा विश्वास अश्विनीला आहे. पण दिग्दर्शकाच्या कामात कंगनाची ढवळाढवळ तिला मान्य नाही.‘पंगा’मध्ये कंगना राणौत एका कबड्डी खेळाडूच्या भूमिकेत दिसणार आहे. कंगनाशिवाय अभिनेत्री नीना गुप्ता आणि पंजाबी अभिनेता जस्सी गिल यात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे़. अलीकडे अश्विनीने या चित्रपटाच्या स्टारकास्टची माहिती देणारा व्हिडिओ जारी केला होता. हा चित्रपट पुढील वर्षी रिलीज होणार आहे. आता त्यापूर्वी ‘पंगा’च्या सेटवर काय काय घडामोडी घडतात, ते पाहणे इंटरेस्टिंग असणार आहे.

टॅग्स :कंगना राणौतमाणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी