Join us
Daily Top 2Weekly Top 5

'आशिकी ३' मधून तृप्ती डिमरी आऊट? दिग्दर्शक अनुराग बसूंनीच खरं काय ते सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 09:33 IST

'ॲनिमल' सिनेमामुळे तिची बदललेली प्रतिमा पाहून मेकर्सने हा निर्णय घेतल्याचं बोललं गेलं.

'आशिकी 3' (Aashiqui 3)सिनेमाची सध्या बॉलिवूडमध्ये खूप चर्चा आहे. कार्तिक आर्यन सिनेमात लीड हिरो असणार हे जवळपास निश्चित झालेलं असताना तृप्ती डिमरीचा (Tripti Dimri) लीड हिरोईन म्हणून विचार सुरु होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून तृप्तीला यातून हटवण्यात आल्याची चर्चा होती. 'ॲनिमल' सिनेमामुळे तिची बदललेली प्रतिमा पाहून मेकर्सने हा निर्णय घेतल्याचं बोललं गेलं. यावर 'आशिकी ३'चे दिग्दर्शक अनुराग बसु  (Anurag Basu) यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

'आशिकी ३' मधून तृप्ती डिमरीला हटवण्यात येण्यामागे दिलेलं कारण खोटं आहे असं दिग्दर्शक अनुराग बसु म्हणाले आहेत. तसंच तृप्तीला याची कल्पनाही आहे असंही त्यांनी सांगितलं. आशिकी ३ साठी निरागस चेहऱ्याच्या अभिनेत्रीचा शोध होता. गेल्या काही सिनेमांमध्ये तृप्तीची झालेली प्रतिमा पाहून तिला काढण्यात आल्याच्या चर्चा होत्या. मात्र सध्या अनुराग बसूंनी या चर्चांचं खंडन केलं आहे. त्यामुळे सगळं सुरळीत झालं  तर 'भूल भुलैय्या ३' नंतर तृप्ती आणि कार्तिक पु्न्हा एकदा पडद्यावर रोमान्स करताना दिसू शकतात.

आशिकी ही सुपरहिट फ्रँचायझी आहे. १९९० साली 'आशिकी' रिलीज झाला होता. राहुल रॉय आणि अनु अग्रवाल यांची केमिस्ट्री, सिनेमातली गाणी सगळंच खूप गाजलं. तर २०१३ मध्ये 'आशिकी २' आला. मोहित सुरीने याचं दिग्दर्शन केलं होतं. हा सिनेमा ब्लॉकबस्टर हिट होता. यातीलही गाणी आजही लोकांच्या ओठांवर आहेत. त्यामुळे साहजिकच प्रेक्षकांना 'आशिकी ३' कडून मोठ्या अपेक्षा असणार आहेत. 

टॅग्स :तृप्ती डिमरीबॉलिवूड