Join us

अनंत आणि राधिकाच्या हळदी समारंभात सलमान खानच्या हातात कोट्यवधींचं घड्याळ, किंमत ऐकून व्हाल थक्क!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2024 16:35 IST

 अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या हळदी समारंभात सलमान हा  काळ्या रंगाचा पठाणी सूटमध्ये दिसला.

देशातील आघाडीचे उद्योगपती मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाह सोहळ्याची लगबग सध्या सुरू आहे. नुकताच या दोघांचा हळदी समारंभ संपन्न झाला. या सोहळ्यामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. त्यामध्ये बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खानदेखील सहभागी झाला. यावेळी सलमान खानच्या हातातील घड्याळाने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतलं. परंतु सलमान खानच्या घड्याळाची किंमत ऐकून अनेक जण थक्क होत आहेत.   

 अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या हळदी समारंभात सलमान हा  काळ्या रंगाचा पठाणी सूटमध्ये दिसला. यावेळी सलमानने त्याचे आवडते निळे ब्रेसलेटही परिधन केले होते. यासोबतच त्याने एक ब्रँडेड घड्याळ हातात घातलं होतं. ज्याची किंमत 20 कोटींपेक्षा जास्त आहे. सोशल मीडियावर व्हायरल पोस्टमध्ये दावा केला जात आहे की, सलमान खानने परिधान केलेलं हे घड्याळ  Patek Philippe ब्रँडचं आहे. हे काही सामान्य घड्याळ नाही. सोन्याने बनलेल्या या घड्याळावर हिरे जडलेले आहेत. सलमान खानला लग्झरी घड्याळांचा शौक आहे. त्याच्याकडे अनेक महागडी घड्याळेही आहेत.  

सलमान खानही अनंत राधिकाच्या संगीत सोहळ्याला उपस्थित होता. भाईजाननेही त्याच्या हटके स्टाइलने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. काळ्या रंगाचं टीशर्ट आणि पँट असा साधाच लूक करून सलमान अंबानींच्या संगीत सोहळ्यात पोहोचला होता. या सोहळ्यात त्याचा रुबाबदार अंदाज पाहायला मिळाला होता. 

मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा अनंत अंबानी हा धाकटा लेक आहे. अनंत आणि राधिकाच्या प्रीवेडिंग सोहळ्याचीदेखील बरीच चर्चा रंगली होती. आता १२ जुलैला  ते लग्नबंधनात अडकणार आहेत. तर १३ जुलैला त्यांचा आशीर्वाद सेरेमनी आणि १४ जुलैला ग्रँड वेडिंग रिसेप्शन असणार आहे.  सलमानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो लवकरच 'सिकंदर' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

 

टॅग्स :सलमान खानबॉलिवूड