बॉलीवुडची मस्तानी अभिनेत्री दीपिका पादुकोणचे नुकतेच अभिनेता रणवीरसह शुभमंगल पार पडलं. लग्नापासून ते रिसेप्शनपर्यंत दीपिकाच्या स्टाईलने साऱ्यांनाच घायाळ केले.सर्वत्र दीपिकाची ड्रेसिंग स्टाईल आणि फॅशनची चर्चा होती. आता पुन्हा ती तिच्या ड्रेसिंगमुळेच चर्चेत आली आहे. आपण ग्लॅमरस, हँडसम कसे दिसू आणि उपस्थितांच्या नजरांसह कॅमे-याच्या नजरा आपल्याकडे कशा राहतील याची सेलिब्रिटी मंडळी विशेष काळजी घेतात. त्यामुळे महागडे डिझायनर ड्रेसेस किंवा स्टायलिश लूकमध्ये सेलिब्रिटी या कार्यक्रमांना हजेरी लावतात. मात्र कधी कधी याच स्टाईल आणि फॅशनमुळे सेलिब्रिटींवर कधी कधी अवघडल्यासारखी परिस्थिती येते. असंच काहीसं दीपिका पादुकोणबरोबर ही घडले आहे.
दीपिका आजची सर्वात लोकप्रिय अभिनेत्री मानली जाती आहे. ही आघाडीची अभिनेत्री आपल्या फॅशन सेन्ससाठीही ओळखली जाते. मात्र पेज थ्री पार्टी आणि सार्वजनिक ठिकाणी हजेरी लावताना अनेकदा दीपिकाचेही फॅशन ब्लंडर झाले आहे. कधी शॉर्ट ड्रेसने तिची फजिती केली तर कधी पारदर्शक कपडे परिधान करुन आल्यानेदेखील तिला लाजिरवाणे व्हावे लागले. अनकम्फर्टेबल ड्रेसिंग स्टाइल दीपिकासाठीही डोकेदुखी ठरल्याचे पाहायला मिळाले. ब-याचदा ती ड्रेस सावरताना ही दिसली.
नुकताच दीपिकाने फिल्मफेयरमध्ये लग्नानंतर पहिली मुलाखत दिली. दीपिका म्हणाली, रणवीर माझ्या भांगात कुंकू भरत असताना मला ‘ओम शांती ओम’चा ‘एक चुटकी सिंदूर’ हा डायलॉग आठवत होता. मी अनेक लग्नाला गेले. पण स्वत:चे लग्न हा किती खास क्षण असतो, हे मला माझ्याच लग्नावेळी जाणवले, असे दीपिका यावेळी म्हणाली. मी अनेक वर्षे एकटी राहिली. पण आता रणवीर माझ्यासोबत राहात आहे. रणवीर त्याच्या कामावर जातो आणि मी माझ्या. पण सकाळी आम्ही एकत्र उठतो. ही लग्नाची सर्वात खास बाब आहे, असेही तिने सांगितले.