Join us

या 7 मुलींपैकी एक मुलगी आज बॉलिवूडवर गाजवतेय राज्य, ओळखा पाहू कोण आहे अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2022 07:00 IST

फोटोत तुम्हाला दिसत असलेल्या सात मुलींपैकी एक बॉलिवूडची टॉप अभिनेत्री आहे..तुम्ही ओळखू शकता का?

वरील फोटोत तुम्हाला दिसत असलेल्या सात मुलींपैकी एक मुलगी बॉलिवूडची टॉप अभिनेत्री आहे..तुम्हाला ओळखता येत आहे का? नाही....? चला तर मग आम्ही तुम्हाला एक हिंट देतो. ही बॉलिवूड अभिनेत्री तिच्या फिटनेससाठी खूप चर्चेत आहे, इतकेच नाही तर अलीकडेच या अभिनेत्रीने अनेक वर्षांनी चित्रपटांमध्ये पुनरागमन केले आहे आणि सध्या ती एका शोला जज करत आहे.

खरं तर, या सात मुलींमध्ये टॉप लाईनच्या मध्यभागी उभी असलेली मुलगी म्हणजे बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी. हा थ्रोबॅक फोटो स्वत: शिल्पाने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे, ज्यामध्ये ती तिच्या शाळेतील मैत्रिणीसोबत उभी आहे. या फोटोमध्ये शिल्पानेही पांढऱ्या रंगाचा शाळेचा ड्रेसमध्ये ती कॅमेऱ्याकडे पाहून हसत आहे.

शिल्पा ‘इंडियन पुलिस फोर्स’ या रोहित शेट्टीच्या सीरिजमध्ये दिसणार आहे. रोहित शेट्टीच्या सीरिजमध्ये ती महिला पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. तिचा लुकही आऊट झाला आहे. या सीरिजद्वारे रोहित शेट्टी ओटीटीवर डेब्यू करतोय. यात शिल्पासोबत सिद्धार्थ मल्होत्रा व विवेक ओबेरॉय आहेत. कॉप युनिवर्सच्या माध्यमातून प्रथमच रोहित शेट्टीसोबत काम करत असल्यानं सुपर थ्रिल्ड अनुभवत असल्याचंही तिनं लिहिलं आहे.

टॅग्स :शिल्पा शेट्टीबॉलिवूड