Join us

या कारणामुळे ऐश्वर्या रायवर रागावल्या होत्या जया बच्चन... कारण आहे खूपच हटके

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2020 14:32 IST

जया बच्चन एकदा ऐश्वर्यावर प्रचंड चिडल्या होत्या आणि ते ही एका सार्वजनिक कार्यक्रमात...

ठळक मुद्देजया बच्चन यांची सून ऐश्वर्या राय रेखा यांना अनेकवेळा अलिंगन देताना आणि त्यांच्यासोबत खूपच चांगल्याप्रकारे वागताना दिसते. हीच गोष्ट जया यांना आवडत नसल्याचे म्हटले जात आहे.

ऐश्वर्या राय आणि जया बच्चन यांना अनेक समारंभात एकत्र पाहिले जाते. त्या दोघींमध्ये खूपच छान नातं असल्याचे म्हटले जाते. पण तुम्हाला माहीत आहे का, जया बच्चन एकदा ऐश्वर्यावर प्रचंड चिडल्या होत्या आणि ते ही एका सार्वजनिक कार्यक्रमात... जया ऐश्वर्यावर चिडल्या असल्याची गोष्ट त्यावेळी अनेकांच्या लक्षात आली होती.

अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या प्रेमकथेविषयी आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे. त्या दोघांच्या प्रेमकथेची त्या काळात चांगलीच चर्चा रंगली होती. एकेकाळी जया बच्चन आणि रेखा या एकमेकींच्या खूप चांगल्या फ्रेंड्स होत्या. पण अमिताभ आणि रेखा यांच्या अफेअरच्या चर्चा मीडियात गाजायला लागल्यानंतर त्या दोघी एकमेकींसोबत खूपच कमी बोलायला लागल्या. सिलसिला या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्यावेळी देखील त्या दोघी एकमेकींशी बोलत नव्हत्या. 

रेखा आणि जया बच्चन सार्वजनिक कार्यक्रमात समोरासमोर आल्या तरी त्या एकमेकांना टाळणेच पसंत करतात. पण अनेकवेळा जया बच्चन यांची सून ऐश्वर्या राय रेखा यांना अनेकवेळा अलिंगन देताना आणि त्यांच्यासोबत खूपच चांगल्याप्रकारे वागताना दिसते. हीच गोष्ट जया यांना आवडत नसल्याचे म्हटले जात आहे. अमिताभ बच्चन यांच्या 102 नॉट आऊट या चित्रपटाच्या स्क्रिनिंगच्यावेळी तर ही गोष्ट अनेकांच्या लक्षात आली होती. डेक्कन क्रोनिकलने दिलेल्या वृत्तानुसार, बच्चन कुटुंबियातील ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यासोबत रेखा यांचे संबंध खूपच चांगले आहेत. त्यामुळे ऐश्वर्या रेखा यांच्यासोबत अतिशय प्रेमाने वागत असल्याची गोष्ट त्यांना आवडली नव्हती हे त्यावेळी फोटोग्राफर्सच्या कॅमेऱ्याने देखील टिपले होते.  

टॅग्स :ऐश्वर्या राय बच्चनजया बच्चनरेखा