Join us  

बापरे बाप ! दोन वेळा मोडला Twinkle Khannaचा साखरपुडा, कारण वाचून व्हाल हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2021 11:45 AM

अक्षय कुमार (Akshay Kumar)  ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna)  आणि मुलगी नितारासोबत  मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करतायेत.

अक्षय कुमार (Akshay Kumar)  ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna)  आणि मुलगी नितारासोबत  मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करतायेत. ट्विंकल २९ डिसेंबर रोजी  आपला ४८ वा वाढदिवस (ट्विंकल खन्ना बर्थडे) साजरा करणार आहे. त्यामुळे ट्विंकल तिचा नवरा आणि मुलगी नितारासोबत तिचा वाढदिवस आणि नवीन वर्ष मालदीवमध्येच सेलिब्रेशन करणार आहे.

ट्विंकल खन्ना बॉलिवूडमध्ये सक्रीय नाही. पण सोशल मीडियावर मात्र ती कमालीची सक्रीय आहे. आपल्या परखड विधानांमुळे ट्विंकल सतत चर्चेत असते. 17 जानेवारी 2001 रोजी ट्विंकलने अक्षय कुमारसोबत लग्नगाठ बांधली. पण हे लग्न करण्यासाठी अक्षयला बरेच प्रयत्न करावे लागले. ट्विंकल खन्नाने एकदा नाही तर दोनदा एंगेजमेंट केले आहे. अर्थात दोन वेगवेगळ्या नाही तर एकाच व्यक्तीसोबत तिने एंगेजमेट केली. आता हा नेमका मामला काय, ते जाणून घेऊ या.

ट्विंकल आणि अक्षय रिलेशनशिपमध्ये होते, तेव्हाची ही गोष्ट. आधी दोघांचा साखरपुडा झाला. पण ट्विंकलसोबत साखरपुडा झाला असताना अक्षय शिल्पा शेट्टीत अडकला. अक्षय व शिल्पाच्या अफेअरच्या बातम्या सगळ्या फिल्मी मॅगझिनमध्ये चवीने चघळल्या जात होत्या. ट्विंकलपर्यंत ही गोष्ट पोहोचली आणि शिल्पा व अक्षयच्या नात्यात मतभेद वाढू लागले. ट्विंकलने अक्षयला तंबी दिली. पण अक्षय तरीही सुधरेना. शेवटी रागाच्या भरात ट्विंकलने अक्षयसोबतचा साखरपुडा तोडला. असे म्हणतात की, लग्न मोडल्यानंतर ट्विंकल डिप्रेशनमध्येही गेली होती.

कालांतराने अक्षयला आपल्या चुकीची जाणीव झाली आणि त्याने शिल्पासोबतचे सगळे संबंध तोडले. इतकेच नाही तर ट्विंकलची माफीही मागितली. मग काय, ट्विंकलने अक्षयला माफ केले आणि दोघांचा पुन्हा साखरपुडा झाला.

अर्थात अक्षयने ट्विंकलला लग्नासाठी प्रपोज केले होते, तेव्हा तिचा ‘मेला’ हा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर होता. हा चित्रपट हिट झालाच तर लग्नासाठी थांबावे लागले आणि फ्लॉप झाला तर लग्न करू, अशी अट सुरुवातीलाच ट्विंकल अक्षयपुढे ठेवली होती. पुढे हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि सुपर फ्लॉप ठरला. मग काय, ट्विंकलला अक्षय कुमारशी लग्न करावे लागले.

टॅग्स :ट्विंकल खन्नाअक्षय कुमार