Join us
Daily Top 2Weekly Top 5

सोनाक्षी सिन्हानं बीफ बर्गर खाल्लं? पती जहीर इक्बालने सत्य काय ते सांगितलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 12:37 IST

सोनाक्षी सिन्हा ही ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे.

सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) आणि जहीर इक्बाल (Zaheer Iqbal) हे बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहे. सोनाक्षी आणि जहीरने २३ जून २०२४ रोजी कुटुंबीय आणि जवळच्या मित्र-मंडळींच्या उपस्थितीत रजिस्टर पद्धतीने लग्न केलं होतं.  अनेकांना त्यांची केमिस्ट्री आवडते.  परंतु काही लोक असेही आहेत, जे त्यांना ट्रोल करण्याचा प्रयत्न करतात. नुकतंच सोनाक्षीचा बर्थडे होता आणि त्यावेळी तिचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. ज्यामुळे ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली. पण, अभिनेत्रीचा पती जहीर इक्बाल याने ट्रोलिंगला योग्य उत्तर देत त्याची बोलती बंद केली आहे. 

सोनाक्षीच्या बर्थडेच्या दिवशी जहीरनं खास व्हिडीओ पोस्ट करत आपल्या लाडक्या बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. जहीरनं सांगितलं की हा व्हिडीओ त्यानं सोनाक्षीला लग्नासाठी प्रपोज करण्याच्या दोन तास आधी शूट केला होता. जहीरनं सोनाक्षीला २०२२ मध्ये तिला प्रपोज केलं होतं. या व्हिडीओमध्ये सोनाक्षीचा बर्गर खाताना दिसून आली. या व्हिडीओवर काही चाहत्यांनी कमेंट करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तर काहींनी सोनाक्षी ही बीफ बर्गर खात असल्याचा दावा केला.

एका युजरने कमेंट केली, "ती बीफ खात आहे का?". तर दुसऱ्याने लिहिलं, पक्का बीफ बर्गर आहे". अशा अनेक कमेंट्सनंतर अखेर जहीर इक्बालने उत्तर दिलं आहे. त्याने स्पष्ट केलं, "परेशान होऊ नका, तो वेजिटेरियन बर्गर आहे".

सोनाक्षी सिन्हा आणि जहीर लग्नाआधी सात वर्षे एकमेकांना डेट करत होते. बऱ्याच वेळा ते एकत्र दिसले होते. तरीही त्यांनी त्यांच्या नात्याबद्दल काहीच सांगितलं नव्हतं. आता येत्या २३ जून २०२४ या दिवशी सोनाक्षी-जहीरच्या लग्नाचा पहिला वाढदिवस आहे. जेव्हा सोनाक्षीनं जहीर याला आपला साथीदार म्हणून निवडलं. तेव्हा काहींनी नाक मुरडलं होतं. सोनाक्षीवर आंतरधर्मीय विवाह केल्याने बरीच टीकाही झाली. पण, सोनाक्षी ट्रोलिंगची फिकिर करत नाही, उलटी समर्पक शब्दात उत्तर देत ट्रोलर्सची तोंडे बंद करते.

टॅग्स :सोनाक्षी सिन्हासेलिब्रिटीबॉलिवूड