मलायका अरोरा (Malaika Arora) गेल्या काही दिवसांपासून अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपमुळे चर्चेत आहे आणि या ब्रेकअपचे दुःख विसरून ती पुढे गेल्याचे दिसते आहे. सध्या तिचा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. खरेतर मलायका नुकतीच एका मिस्ट्री मॅनसोबत दिसली होती. तिचा हा व्हिडीओ पाहून नेटकरी ती पुन्हा प्रेमात पडली असल्याचा तर्क लावत आहे.
काही दिवसांपूर्वी अर्जुन कपूरने एका कार्यक्रमात त्यांच्या ब्रेकअपला दुजोरा दिला आहे आणि सिंगल असल्याचे सांगितले होते. दरम्यान मलायका ब्रेकअप झाल्यापासून एकामागून एक क्रिप्टिक पोस्ट शेअर करत होती आणि आता ती नुकतीच एका अनोळखी माणसासोबत दिसली. तिच्यासोबत तिची बहीण अमृता अरोराही तिथे होती.
कोण आहे मिस्ट्री मॅन?व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हा मिस्ट्री मॅन कोण आहे? हे जाणून घेण्याची उत्सुकता नेटकऱ्यांमध्ये आहे. अर्जुन कपूरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर मलायका दुसऱ्या कुणाला डेट करत आहे का? तथापि, काही लोक म्हणतात की तो तिचा मित्र किंवा सहकारी असू शकतो.
हातात हात धरून चालताना दिसली मलायकाव्हिडिओमध्ये मलायका त्या व्यक्तीचा हात धरून चालताना आणि हसताना दिसत आहे. आता तो कोण आहे हे लवकरच कळेल. पण मलायकाकडे पाहता ती प्रत्येक परिस्थिती हसतमुखाने स्वीकारत असल्याचे दिसते. ब्रेकअपमुळे ती दुखावलेली असल्याचे सोशल मीडिया पोस्टमध्ये स्पष्टपणे दिसत आहे, परंतु ती थेट काहीही बोलणे टाळत आहे. त्याचवेळी, काही दिवसांपूर्वी मलायका एका अनोळखी व्यक्तीसोबत डिनर डेटवर स्पॉट झाली होती. त्यावेळीही युजर्सनी ही अभिनेत्री आता दुसऱ्या कोणाला तरी डेट करत असल्याचा अंदाज लावला होता.