Join us

दीया मिर्झाचे लग्न लावून देणारी ती महिला कोण? सोशल मीडियावर होतेय तिची सर्वाधिक चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2021 18:13 IST

Dia Mirza wedding solemnised by a woman priest: दीया मिर्झाच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आल्यानंतर काही वेळातच व्हायरल झाले आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री दीया मिर्झाचे नुकतेच वैभव रेखी सोबत लग्नबेडीत अडकले आहेत. दीया मिर्झाच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आल्यानंतर काही वेळातच व्हायरल झाले आहेत. या फोटोत दीया मिर्झा आणि वैभव रेखी यांच्यासोबतच आणखी एका व्यक्तीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. ते म्हणजे त्यांचे लग्न एका महिला भटजीने लावून दिले. या महिलेची सर्वाधीक चर्चा सर्वत्र होताना दिसत आहे. 

दीया मिर्झाने लग्नाचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत लिहिले की, प्रेम एक संपूर्ण चक्र आहे ज्याला आपण घर म्हणतो. त्याची हाक ऐकणे, त्यासाठी दरवाजे खुले करणे आणि मग त्याला भेटणे हे जादूसारखे आहे. स्वत: संपूर्ण होण्याचा हा क्षण मी आपल्या सर्वांसोबत शेअर करत आहे. माझे कुटुंब मोठे झाले आहे. ईश्वर करो की प्रत्येक तुकड्याला त्याच्या पुरक तुकडा मिळो, सर्व हृदय जोडले जावे आणि प्रेमाची जादू आपल्या आजूबाजूला साकार होताना दिसू दे.'

फोटोमधील महिला भटजींनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्या स्वत: मंत्र म्हणून यज्ञात हवन करत आहेत. या महिला भटजींचे नाव आहे शीला अत्ता. दीया मिर्झाने ट्विटरवर लग्नाचा फोटो शेअर करत शीला अत्ता यांचे आभार मानले आहेत. तिने म्हटले की, या गोष्टीचा अभिमान वाटतो आहे की आपण समाजातील बदलांचे भागीदार बनू शकतो. स्त्री-पुरूष समानता. 

अनेकांनी या फोटोवर प्रतिक्रिया देत त्यांचे कौतुक केले आहे. दीया आणि वैभव यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.

टॅग्स :दीया मिर्झा