Join us

तुमचा भूतकाळ कितीही वाईट असो...! दुसऱ्या लग्नानंतर दीया मिर्झाची पोस्ट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2021 14:13 IST

दीया नुकतीच बिझनेसमन वैभव रेखीसोबत दुस-यांदा लग्नबेडीत अडकली. म्हणायला दीया व वैभवचा लग्नसोहळा खासगी होता. पण या लग्नाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली.

ठळक मुद्देकाही दिवसांपूर्वीच वैभव रेखीची पहिली पत्नी सुनैना रेखी हिने दिया-वैभवच्या लग्नावर आपली प्रतिक्रिया दिली होती.

गेल्या आठवड्यापासून बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झा चांगलीच चर्चेत आहे. दीया नुकतीच बिझनेसमन वैभव रेखीसोबत दुस-यांदा लग्नबेडीत अडकली. म्हणायला दीया व वैभवचा लग्नसोहळा खासगी होता. पण या लग्नाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली. लग्नाचे एक ना अनेक फोटो, व्हिडीओ व्हायरल झालेत. लग्नानंतर आठवडाभराने दीयाने वैभवसोबतचा लग्नातील एक सुंदर फोटो शेअर करत, एक खास पोस्ट लिहिली आहे.फोटोत दीया व वैभव लग्नमंडपात आहे. वैभव दीयाच्या खांद्यावर डोकं ठेवून हसतोय. दीयाच्या ओठांवरही हसू आहे.  ‘तुमचा भूतकाळ कितीही वाईट असो,पण तुम्ही नेहमीच एक नवी सुरुवात करू शकता,’असे बुद्धाचे वचन तिने दीयाने हा फोटो शेअर केला आहे.

दीयाचे हे दुसरे लग्न आहे. तिचा दुसरा पती वैभव याचेही हे दुसरे लग्न आहे. वैभवशी लग्न करण्यासाठी दीयाने 2019 मध्ये साहिल संघाला घटस्फोट दिला होता. दीया मिर्झाने ऑक्टोबर 2014 मध्ये  साहिल सिंघाशी लग्न केले होते. मात्र या दोघांचे लग्न फार काळा काही टिकले नाही. साहिलला 2019 मध्ये घटस्फोट घेत ती वेगळी झाली होती.

काही दिवसांपूर्वीच वैभव रेखीची पहिली पत्नी सुनैना रेखी हिने दिया-वैभवच्या लग्नावर आपली प्रतिक्रिया दिली होती. ‘या लग्नात ती सहभागी होऊ शकली. आमचे मुंबईमध्ये कोणी नातेवाईक नाहीत. पण या लग्नामुळे कुटुंबात नवे लोक जोडले गेले आहेत. माझी मुलगी समायराला एक नवी आणि मोठी फॅमिली मिळाली आहे. ती खूप खुश आहे. त्यामुळे मलाही या लग्नाबद्दल आनंदच आहे.  मी दिया आणि वैभवला त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देते,’ असे ती म्हणाली होती.

टॅग्स :दीया मिर्झा