Join us
Daily Top 2Weekly Top 5

Dhurandhar X Review: अभिनयात सगळे धुरंधर, पण कथा...? कसा आहे सिनेमा, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 10:26 IST

धुरंधर सिनेमा पाहण्याचा विचार करताय. त्याआधी वाचा प्रेक्षकांचं मत. आणि मग सिनेमा बघायचा की नाही ते ठरवा

रणवीर सिंगचा 'धुरंधर' सिनेमा आज रिलीज झाला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या सिनेमाची चांगलीच चर्चा होती. त्यामुळे प्रेक्षकांनी अॅडव्हान्स बुकींगमध्येच 'धुरंधर' सिनेमाला हाऊसफुल्ल प्रतिसाद दिला आहे. अशातच 'धुरंधर' सिनेमा रिलीज झाल्यावर प्रेक्षकांनी त्यांच्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. काय म्हणाले प्रेक्षक जाणून घ्या.

एका युजरने 'धुरंधर'ला ४ स्टार दिले आहेत. युजरने लिहिलंय की, देशभक्ती जागवणारा एक सुंदर सिनेमा म्हणजे धुरंधर. पहिल्या प्रसंगापासून सिनेमात देशभक्ती दाखवली गेली आहे. रणवीरने त्याच्या कारकीर्दीतील खूप चांगला परफॉर्मन्स दिला आहे. अॅक्शन, इमोशन्स आणि सुंदर कथानकाची उत्कृष्ट बांधणी करण्यात आली आहे. धुरंधर हा थिएटरमधील जबरदस्त अनुभव आहे.

 

आणखी एका युजरने 'धुरंधर' सिनेमाला २ स्टार दिलेत. त्याने लिहिलंय की, ''मी आतापर्यंत पाहिलेला वाईट सिनेमा म्हणजे धुरंधर. कंटाळवाणी गाणी,  सारा अर्जुन आणि रणवीर सिंगमध्ये काहीच केमिस्ट्री नाही. ताणलेली कथा आणि अनावश्यक हिंसा. प्रामाणिकपणे सांगायचं तर तुमचा वेळ वाया घालवू नका.''

एका युजरने सिनेमाला साडे चार स्टार दिले आहेत. त्याने रणवीरचा फोटो शेअर करुन लिहिलंय की, 'पूर्ण पैसा वसूल. रणवीर सिंगने खऱ्या अर्थाने अभिनयात बाजी मारली आहे. सिनेमातील अॅक्शन खतरनाक आहे आणि शेवटपर्यंत तुम्हाला खिळवून ठेवणारी कथा आहे. बॉक्स ऑफिसवर त्सुनामी येणार आहे.'' 

फिल्म समीक्षक कमाल आर खानने लिहिलंय की, ''एका बॉलिवूड दिग्दर्शकाने धुरंधर सिनेमा पाहून त्याचा रिव्ह्यू लिहिला आहे. हा अत्यंत संथ डॉक्य्यूमेंट्री टाईप सिनेमा झाला आहे. आदित्य धरने या सिनेमासाठी ३०० कोटींहून अधिक का खर्च केले आहेत? जिओने सुद्धा या वाईट सिनेमासाठी इतके पैसे का खर्च केले आहेत, समजत नाही.''

एका नेटकऱ्याने धुरंधरचं कौतुक करताना लिहिलंय की, ''एका शब्दात सांगायचं तर, आदित्य धर भाई काय सिनेमा बनवलाय तुम्ही. धुरंधरला अजिबात रोखू शकत नाही.''

एकूणच  'धुरंधर'चे रिव्ह्यू पाहून समजतंय की, काहींना हा सिनेमा आवडलेला दिसतोय तर काहींना मात्र सिनेमा कंटाळवाणा वाटत आहे. या सिनेमाबद्दल सांगायचं तर रणवीर सिंग सिनेमात प्रमुख भूमिकेत आहे. रणवीरसोबत सिनेमात अक्षय खन्ना, संजय दत्त, आर.माधवन, अर्जुन रामपाल, सारा अर्जुन हे कलाकारही दिसत आहेत. आज ५ डिसेंबरला सिनेमा रिलीज झाला असून बॉक्स ऑफिसवर सिनेमा किती कमाई करणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : "Dhurandhar" Movie Review: Strong actors, but is the story compelling?

Web Summary : Ranveer Singh's "Dhurandhar" receives mixed reviews. Some praise the film's patriotism, action, and Ranveer's performance, calling it a must-watch. Others criticize the weak story, lack of chemistry, and excessive violence, deeming it a waste of time. The film's box office performance is highly anticipated.
टॅग्स :रणवीर सिंगअक्षय खन्नाअर्जुन रामपालआर.माधवनबॉलिवूडसंजय दत्त