Join us
Daily Top 2Weekly Top 5

'धुरंधर: द रिव्हेंज'चं पहिलं गाणं येणार, सिनेमाबद्दल मोठी अपडेट समोर; ट्रेलर लाँच कुठे होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 14:07 IST

आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' पार्ट २ ची चर्चा

आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर'च्या दुसऱ्या पार्टची म्हणजेट 'धुरंधर:द रिव्हेंज'ची सर्वांनाच उत्सुकता आहे. पहिल्या पार्टने रेकॉर्डतोड कामगिरी केली. सिनेमातील गाणी अजूनही चाहत्यांच्या ओठांवर आहेत. आता याचा सीक्वेल आणखी दमदार, खतरनाक असणार आहे.  या महिन्यात 'धुरंधर: द रिव्हेंज'चं गाणं येईल अशी चर्चा आहे. तसंच पार्ट २ चा ट्रेलर जोरात होणार आहे. 'धुरंधर: द रिव्हेंज'बद्दल काय अपडेट आहेत वाचा.

'धुरंधर'मधील 'रम्बा हो','धुरंधर टायटल ट्रॅक','गेहरा हुआ', 'कारवाँ' अशी सगळीच गाणी गाजली. आता 'धुरंधर: द रिव्हेंज'च्या गाण्यांचीही सर्वांना उत्सुकता आहे. दरम्यान याच महिन्यात धुरंधर: द रिव्हेंजचं पहिलं गाणं रिलीज होणार आहे. आता हे रोमँटिक गाणं असेल की डान्स नंबर की अॅक्शन ट्रॅक असेल यावर अजून काहीही अपडेट आलेलं नाही.

काही दिवसांपूर्वीच 'धुरंधर:द रिव्हेंज'चा टीझर रिलीज झाला ज्याला संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या. दरम्यान ५ मार्च रोजी सिनेमाचा ट्रेलर लाँच मुंबईतील  नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमध्ये पार पडणार आहे. हा एक ग्रँड इव्हेंट असणार आहे. सिनेमाची संपूर्ण स्टारकास्ट यावेळी उपस्थित  असेल. यावेळी मेकर्स हा इव्हेंट अधिक ग्लॅमरस आणि हाय प्रोफाईल बनवतील अशी चर्चा आहे.

सिनेमाच्या रिलीजआधी ट्रेलर आणि गाण्यातून मेकर्स एक माहोल सेट करणार आहेत. अॅक्शन, ड्रामा आणि इमोशनने भरलेला हा सिनेमा आपल्या पहिल्या पार्टचा रेकॉर्ड मोडणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे. १९ मार्च रोजी सिनेमा रिलीज होणार आहे. पहिल्या भागाने तब्बल १३०० कोटींचा बिझनेस केला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : 'Dhurandhar: The Revenge' Song Release, Trailer Launch Details Revealed

Web Summary : 'Dhurandhar: The Revenge' first song releasing this month. Trailer launches March 5th at NMACC, Mumbai. The film, filled with action and drama, releases March 19th, aiming to break records set by its successful first part.
टॅग्स :धुरंधर सिनेमारणवीर सिंगबॉलिवूड