Join us
Daily Top 2Weekly Top 5

'धुरंधर: द रिव्हेंज' पाहणार आहात? थिएटरमध्ये जाण्यापूर्वी हे जाणून घ्या; रनटाइमपासून बुकिंगपर्यंत सर्व डिटेल्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 15:47 IST

अभिनेता रणवीर सिंगच्या 'धुरंधर: द रिव्हेंज' या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी, त्याचा कालावधी आणि सेन्सॉर प्रमाणपत्राशी संबंधित तपशील समोर आले आहेत.

दिग्दर्शक आदित्य धरचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'धुरंधर: द रिव्हेंज' (Dhurandhar: The Revenge) येत्या गुरुवारी १९ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पहिल्या भागाच्या तुफान यशानंतर, या सिक्वेलबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. आता या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी, त्याचा कालावधी आणि सेन्सॉर प्रमाणपत्राशी संबंधित तपशील समोर आले आहेत.  

साधारणपणे सध्याच्या काळात चित्रपट दोन तासांचे असतात, मात्र आदित्य धरनं पुन्हा एकदा 'लार्जर दॅन लाईफ' अनुभवासाठी मोठा कालावधी निवडला आहे. 'पिंकविला'च्या वृत्तानुसार, 'धुरंधर २' चा कालावधी तब्बल ३ तास ५२ मिनिटे इतका आहे. ५ डिसेंबर २०२५ रोजी प्रदर्शित झालेला पहिला भाग ३ तास ३४ मिनिटांचा होता. म्हणजेच, दुसरा भाग पहिल्यापेक्षा १८ मिनिटांनी मोठा असून प्रेक्षकांना पावणे चार तास खुर्चीला खिळवून ठेवणार आहे.

सेन्सॉर बोर्डाकडून 'A' सर्टिफिकेटचित्रपटातील जबरदस्त ॲक्शन, हिंसाचार आणि गंभीर कथानक पाहता, 'सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन' (CBFC) ने या चित्रपटाला 'A' (Adults Only) म्हणजेच केवळ प्रौढांसाठीचे प्रमाणपत्र दिले आहे. पहिल्या भागालाही अशाच प्रकारचे प्रमाणपत्र मिळाले होते, ज्यामुळे हा चित्रपट वास्तववादी असणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

ॲडव्हान्स बुकिंगमध्ये धमाकाप्रदर्शनाला अवघे दोन दिवस उरले असताना 'धुरंधर २' ने बॉक्स ऑफिसवर त्सुनामी आणली आहे. 'सॅकनिल्क'च्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत ६,७०,००० तिकिटांची विक्री झाली आहे. ॲडव्हान्स बुकिंगमधून तब्बल ६५ कोटींहून अधिक कमाई झाली आहे. यामध्ये पेड प्रिव्ह्यूज आणि ब्लॉक सीट्सचाही समावेश आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Dhurandhar: The Revenge - Know before you go to theaters!

Web Summary : Dhurandhar: The Revenge releases March 19th. Running time is 3 hours 52 minutes. The film received an 'A' certificate. Advance booking sales are booming, exceeding 65 crore with 6,70,000 tickets sold.
टॅग्स :रणवीर सिंगबॉलिवूडधुरंधर सिनेमा