Join us
Daily Top 2Weekly Top 5

'धुरंधर: द रिव्हेंज': उरले फक्त ६ दिवस, यामीचा हॉस्पिटलमधला सीन देणार कथेला वेगळं वळण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 12:11 IST

'धुरंधर: द रिव्हेंज'ची उत्सुकता वाढली

सध्या सिनेप्रेमी १९ मार्चची वाट पाहत आहेत. कारण या दिवशी बहुप्रतिक्षित 'धुरंधर: द रिव्हेंज' रिलीज होणार आहे. आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर'ने डिसेंबर महिन्यात रिलीजनंतर छप्परफाड कमाई केली. नंतर प्रेक्षकांमध्ये दुसऱ्या भागाची आतुरता होती. 'धुरंधर: द रिव्हेंज'मध्ये यामी गौतम, विकी कौशल दिसणार अशी सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली. हे दोघं खरोखर सिनेमा दिसणार का? वाचा

मीडिया रिपोर्टनुसार, यामी गौतमचा 'धुरंधर: द रिव्हेंज'मध्ये कॅमिओ आहे. याचं कनेक्शन तिच्या 'उरी: द सर्जिकल स्ट्राईक'मधील पात्राशी आहे. बॉक्स ऑफिस वर्ल्डवाइडनुसार, यामी गौतमचा कॅमिओ हॉस्पिटमध्ये एक सीन असणार आहे. हा सीन चित्रपटाच्या कथेला एका वेगळ्या वळणावर घेऊन जातो. यामीच्या कॅमिओबद्दल अद्याप मेकर्सने अधिकृतरित्या काहीच जाहीर केलेले नाही.

तर काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असंही नमूद केलं आहे की सिनेमा विकी कौशलचाही कॅमिओ आहे. त्याचा रोलही 'उरी: द सर्जिकल स्ट्राइक'मधील भूमिकेशीच जोडला गेला आहे. २०१९ मध्ये आलेल्या सिनेमात विकीने मेजर विहान शेरगिलची भूमिका साकारली होती ज्याने सर्जिकल स्ट्राइकचे ऑपरेशन लीड केले होते. तसंच 'धुरंधर: द रिव्हेंज'मध्ये विकी कौशल असणार ही चर्चा तेव्हाच सुरु झाली जेव्हा 'धुरंधर'च्या शेवटी रणवीर सिंहचं खरं नाव जसकीरत सिंह रंगी असल्याचा खुलासा झाला. कारण उरीमध्ये कीर्ति कुल्हारीने केलेल्या भूमिकेत तिच्या शहीद नवऱ्याचं नाव तिने जसकीरत सिंह रंगीच घेतलेलं होतं. तसंच जानेवारी महिन्यात एक अशीही बातमी आली की विकी कौशलने धुरंधरमधील कॅमिओचं शूट पूर्ण केलं आहे. मात्र आदित्य धरने आजपर्यंत सिनेमातील स्टार्सविषयी मौन बाळगलं आहे. तसंच सिनेमाचं उरीशी कनेक्शन असेल तर दोन्ही कथांमधील टाईमलाइनमध्ये अंतर असूनही आदित्य धरने अतिशय चतुराईने सिनेमात उरीचा ट्रॅक आणला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : 'Dhurandhar: The Revenge': Yami's cameo to twist the plot?

Web Summary : Anticipation surrounds 'Dhurandhar: The Revenge' release. Reports suggest Yami Gautam's cameo, linked to her 'Uri' role, could significantly alter the storyline. Vicky Kaushal's potential appearance, also tied to 'Uri', adds to the excitement, though confirmations remain unverified.
टॅग्स :धुरंधर सिनेमायामी गौतमविकी कौशलरणवीर सिंग