Join us
Daily Top 2Weekly Top 5

'घर की याद नहीं आयी जस्सी?' डायलॉगला मिळालेल्या प्रतिसादामुळे भारावला 'पिंदा', म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2026 13:40 IST

'धुरंधर: द रिव्हेंज'मधील इंटरवल आधीचा डायलॉग तुफान व्हायरल होतोय, यावर अभिनेत्याने प्रतिक्रिया दिली आहे. कोण आहे हा अभिनेता?

'धुरंधर: द रिव्हेंज' सिनेमातील मध्यंतराच्या सीनची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. पिंदा या कॅरेक्टरचा 'घर की याद नही आयी जस्सी' हा डायलॉग तुफान गाजतोय. मध्यंतरानंतरच हा डायलॉग आहे ज्यामध्ये हमजा म्हणजेच जसकीरतचा लहानपणीचा मित्र पिंदा त्याच्यासमोर येतो. सुरुवातीला पिंदाने आपल्याला ओळखलं नाही असा हमजाचा गैरसमज होतो. मात्र इंटरव्हलपूर्वी पिंदा हमजाला म्हणतो, 'घर की याद नही आयी जस्सी?'. या डायलॉगला प्रेक्षकांनी दिलेल्या उत्सफुर्त प्रतिसादावर अभिनेत्याने प्रतिक्रिया दिली आहे.

पिंदा ही भूमिका अभिनेता उदयबीर संधूने साकारली आहे. सोशल मीडियावर त्याच्या डायलॉगला मिळालेला प्रतिसाद पाहून तो अक्षरश: भारावून गेला आहे. हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, "तो सीन किती महत्वाचा होता हे आम्हाला माहित होतं. पण त्यावर अशा प्रकारचा प्रतिसाद येईल असं आम्हाला वाटलं नव्हतं. माझा तर अजुनही विश्वास बसत नाहीये. प्रेक्षकांनी तो एक डायलॉग अक्षरश: उचलून धरला आहे हे पाहून खूप भारी वाटतंय."

तो पुढे म्हणाला, "माझ्या भूमिकेला सुरुवातीला इतका प्रतिसाद मिळेल अशी मी कल्पनाही केली नव्हती. इतर कलाकारांप्रमाणेच मीही आपल्याला किती स्क्रीनटाईम मिळतोय हेच बघत होतो. कारण माझे सिनेमात फारसे सीन्स नाहीत. पण माझ्या वाट्याला जे सीन्स आले आहेत ते नक्कीच प्रभाव पाडतील असा विश्वास आदित्य धरला होता. त्याने मला तसं बोलून दाखवलं होतं आणि तसंच घडलं."

रणवीर सिंहचं केलं कौतुक

अभिनेता उदयबीर रणवीर सिंहचं कौतुक करत म्हणाला, "मी आतापर्यंत पाहिलेल्या सर्वात हुशार कलाकारांपेकी रणवीर एक आहे. तो अतिशय प्रेमळ आणि मला मोठ्या भावासारखाच आहे. त्याने मला प्रत्येक सीनवेळी मार्गदर्शन केलं. आमचा फाईट सीक्वेन्स शूट झाल्यावर त्याने मला कॉम्प्लिमेंट दिली. 'तेरे मे बहुत एनर्जी है' असं तो म्हणाला. त्याच्याकडून असं कौतुक ऐकायला मिळणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती."

English
हिंदी सारांश
Web Title : Pinda overwhelmed by response to 'Ghar Ki Yaad Nahi Aayi Jassi?'

Web Summary : Udaybir Sandhu, who played Pinda in 'Dhurandar: The Revenge,' is thrilled with the audience's response to his dialogue, 'Ghar Ki Yaad Nahi Aayi Jassi?'. He praised Ranveer Singh for his guidance and support during filming.
टॅग्स :रणवीर सिंगधुरंधर सिनेमाबॉलिवूड