'धुरंधर' सिनेमामुळे चर्चेत आलेली लोकप्रिय पंजाबी गायिका जस्मिन सँडलास सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. एका लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान प्रेक्षकांमधील काही पुरुष महिलांशी गैरवर्तन करत असल्याचे लक्षात येताच जस्मिनने आपला परफॉर्मन्स मध्येच थांबवला. केवळ गाणं थांबवून ती शांत बसली नाही, तर तिने त्या पुरुषांना स्टेजवरूनच सर्वांसमोर खडे बोल सुनावले आणि सुरक्षा रक्षकांना त्यांना बाहेर काढण्यास सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, कॉन्सर्टमध्ये गाणी सुरू असताना जस्मिनचे लक्ष गर्दीतील एका कोपऱ्यात गेले. त्या ठिकाणी काही तरुण मुलं मुलींची छेड काढत होते. हे पाहताच जस्मिनने तात्काळ संगीत थांबवण्यास सांगितले आणि माईक हातात घेऊन सुरक्षा रक्षकांना उद्देशून म्हणाली की, "सिक्युरिटी, तुम्ही कृपया या दोन माणसांना इथून बाहेर काढू शकता का? हे या महिलांना त्रास देत आहेत." जस्मिनचा हा करारी बाणा पाहून उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून तिचं समर्थन केलं.
यावेळी जस्मिनने एक अत्यंत महत्त्वाचे विधान केले जे सध्या चर्चेत आहे. ती म्हणाली की, जर माझ्या कॉन्सर्टमध्ये महिलांना सुरक्षित वाटत नसेल, तर मी तिथे परफॉर्म करणार नाही. कलाकार म्हणून केवळ मनोरंजन करणे हीच माझी जबाबदारी नसून, माझ्या कार्यक्रमात येणाऱ्या प्रत्येकाला, विशेषतः महिलांना सुरक्षित वाटणे हे माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला असून नेटकरी जस्मिनच्या संवेदनशीलतेचं कौतुक करत आहेत. "अनेक कलाकार अशा घटनांकडे दुर्लक्ष करून आपला शो पूर्ण करतात, पण जस्मिनने कामापेक्षा महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले," अशा प्रतिक्रिया चाहत्यांकडून उमटत आहेत. या कार्यक्रमात अभिनेत्री आयशा खान आणि क्रिस्टल डिसूजा यांनीही हजेरी लावली होती. जस्मिन सँडलासने घेतलेल्या या भूमिकेमुळे सार्वजनिक कार्यक्रमांमधील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
Web Summary : Singer Jasmin Sandlas stopped her live concert after noticing men harassing women. She publicly reprimanded them and had security remove them, emphasizing women's safety over performance. The incident sparked praise online, highlighting women's safety in public events.
Web Summary : गायिका जैस्मिन सैंडलास ने महिलाओं से छेड़छाड़ करते देख अपना लाइव कॉन्सर्ट रोक दिया। उन्होंने सार्वजनिक रूप से उन्हें फटकार लगाई और सुरक्षाकर्मियों ने उन्हें बाहर निकाल दिया, प्रदर्शन से ज्यादा महिलाओं की सुरक्षा पर जोर दिया। इस घटना की ऑनलाइन प्रशंसा हुई, सार्वजनिक कार्यक्रमों में महिलाओं की सुरक्षा पर प्रकाश डाला गया।