Join us
Daily Top 2Weekly Top 5

'धुरंधर'ने १३ व्या दिवशीही बॉक्स ऑफिस गाजवलं, 'पुष्पा २'चा रेकॉर्ड मोडत रचला नवा इतिहास

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 11:08 IST

जाणून घ्या नेमके किती आहे 'धुरंधर'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन?

Dhurandhar Box Office Collection Day 13 : आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' चित्रपट या सिनेमाचे वादळ बॉक्स ऑफिसवर पाहायला मिळते आहे. प्रत्येक दिवसाच्या कमाईनंतर या सिनेमाच्या कलेक्शनमध्ये मोठी वाढ होताना दिसते आहे. 'धुरंधर' रीलिज होऊन केवळ १३ दिवस झाले आहेत आणि या १३ दिवसात रणवीर सिंग आणि अक्षय खन्नाच्या सिनेमा आता ४५० कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सज्ज झाला आहे.  प्रदर्शनाच्या १३ व्या दिवशी म्हणजे काल बुधवार १७ डिसेंबर रोजी या चित्रपटाने २५.५० कोटी रुपयांची कमाई करत नवा विक्रम केला आहे. ट्रेड ट्रॅकर 'सॅकनिल्क'च्या आकडेवारीनुसार, १३ व्या दिवसाच्या कमाईसह चित्रपटाचे एकूण कलेक्शन आता ४३७.२५ कोटींपेक्षा अधिक झाले आहे.

चित्रपटाने पहिल्या वीकेंडला जबरदस्त ओपनिंग करत एकूण १०३ कोटी रुपयांची कमाई केली. शुक्रवारी २८ कोटी, शनिवारी ३२ कोटी आणि रविवारी ४३ कोटी कमावले. त्यानंतर सोमवारी २३.२५ कोटी, मंगळवारी २७ कोटीसह एकूण कमाई १५० कोटींच्या पुढे गेली. बुधवार आणि गुरुवारी प्रत्येकी २७ कोटी कमावत पहिल्या आठवड्याची एकूण कमाई २०७.२५ कोटी रुपये झाली.

यानंतर दुसऱ्या वीकेंडलाही 'धुरंधर'ची कमाई दमदार राहिली. शुक्रवारी ३२.५ कोटी, शनिवारी ५३ कोटी आणि रविवारी ५८ कोटी रुपये कमावले. यानंतर सोमवारी ३०.५ कोटी, मंगळवारी ३० कोटी आणि बुधवारी २५.५० कोटी रुपयांचा गल्ला जमवला. यामुळे चित्रपटाची एकूण कमाई थेट ४३७.२५ कोटी रुपयांवर पोहोचली.  'धुरंधर'ने बॉक्स ऑफिसवर बजेट वसुल तर केलेच आहे, शिवाय जबरदस्त नफाही कमावला. अशीच घोडदौड सुरू झाल्यास येत्या २ किंवा ३ दिवसात ५०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री होईल.

'धुरंधर' हा हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात दुसऱ्या आठवड्यात २०० कोटी रुपयांची कमाई करणारा पहिला चित्रपट ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम 'पुष्पा २'च्या नावावर होता, ज्याने दुसऱ्या आठवड्यात १९९ कोटी रुपये कमावले होते. विशेष म्हणजे, धुरंधरने हा टप्पा अवघ्या ५ दिवसांत पार केला आहे. व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी या यशाचे वर्णन 'अविश्वसनीय' असे केले आहे. 

परदेशात किती कमावलेदरम्यान, 'धुरंधरच्या जागतिक कमाईकडे पाहिल्यास हे आकडेही थक्क करणारे आहेत. रणवीर सिंग आणि अक्षय खन्ना यांच्या या चित्रपटाने अवघ्या १२ दिवसांत जगभरातून ६३४ कोटी रुपयांची कमाई केली असून, १३ दिवसांत हा आकडा जवळपास ७०० कोटींच्या आसपास पोहोचला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाने केवळ परदेशी बाजारातूनच १५० कोटी रुपयांहून अधिक कमाई करत जगभरात आपली धाक जमवली आहे.

'धुरंधर'समोर आता 'अवतार ३'चं मोठे आव्हान

येत्या शुक्रवारी हॉलिवूडचा 'अवतार: फायर अँड ॲश' प्रदर्शित होत आहे, तर ख्रिसमसला इतरही काही मोठे बॉलिवूड चित्रपट रांगेत आहेत. त्यामुळे 'धुरंधर'ची बॉक्स ऑफिसवर इतर चित्रपटांबरोबर टक्कर होईल. 

'धुरंधर २' कधी येणार? 'धुरंधर' या चित्रपटात रणवीर सिंग आणि अक्षय खन्ना यांच्याशिवाय, संजय दत्त, आर. माधवन आणि अर्जुन रामपाल यांसारख्या दिग्गज कलाकारांची फौज आहे. चित्रपटाच्या तुफान यशानंतर निर्मात्यांनी अधिकृतपणे १९ मार्च २०२६ रोजी याचा सिक्वेल प्रदर्शित करण्याची घोषणा केली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : 'Dhurandhar' Dominates Box Office, Breaks Records, Surpasses 'Pushpa 2'

Web Summary : Aditya Dhar's 'Dhurandhar' continues its box office reign, earning ₹437.25 crore in 13 days. It surpassed 'Pushpa 2' to become the first Hindi film to earn ₹200 crore in its second week. A sequel is slated for March 19, 2026.
टॅग्स :धुरंधर सिनेमाबॉक्स ऑफिस कलेक्शनरणवीर सिंगअक्षय खन्ना