'धुरंधर' या सिनेमामुळे सध्या प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री म्हणजे आयशा खान (Ayesha khan). या सिनेमातील शरारत या गाण्यावर जबरदस्त डान्स करत तिने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. सध्या नेटकऱ्यांमध्ये चर्चेत येणाऱ्या या अभिनेत्रीचा इंडस्ट्रीतील हा प्रवास सोपा नव्हता. सुरुवातीच्या काळात तिला बॉडी शेमिंगसारख्या गोष्टींचा सामना करावा लागला. एका मुलाखतीमध्ये तिने याविषयी भाष्य केलं आहे.
आजच्या घडीला 'धुरंधर'मधील गाण्यामुळे चर्चेत येणाऱ्या आयशाला तिच्या वाढलेल्या वजनामुळे एका गाण्यातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. 'वी द वुमन' या कार्यक्रमात तिने तिची ही कटू आठवण सांगितली.
''मी १२ वीत असतांना टी-सीरीजच्या एका गाण्यासाठी माझी निवड झाली होती. त्या गाण्यात मी सेकंड लीड होते. परंतु, गाण्याच्या शुटिंगच्या एक दिवस आधी मला त्या गाण्यातून बाहेरचा रस्ता दाखवला. माझं वजन जास्त आहे. मी जाड आहे असं त्या लोकांना त्यावेळी वाटलं होतं. त्यामुळे त्यांनी मला गाण्यातून काढलं'', असं आयशा म्हणाली.
पुढे ती म्हणते, ''मला माझ्या शरीराचा आणि कॉन्फिटेंडली सगळ्यांसमोर जाण्यासाठी खूप वेळ लागला. सोशल मीडियावरही मला अनेकांनी माझ्या दिसण्यावरुन ट्रोल केलं. मी कोणतेही कपडे घातले तरी लोक मला वाईट कमेंट करायचे. त्यामुळे मला कोणताही फोटो पोस्ट करतांना १० वेळा विचार करावा लागायचा.'' दरम्यान, 'बिग बॉस 17' मुळे आयशाला खरी ओळख मिळाली. त्यानंतर सध्या धुरंधरमधील गाण्यामुळे तर तिचं नशीबच पालटलं आहे. यापूर्वी तिने कपिल शर्माच्या 'किस किस को प्यार करुं' या सिनेमात काम केलं होतं.
Web Summary : Ayesha Khan, now famous for 'Dhurandhar', revealed she was dropped from a T-Series song due to her weight during her 12th grade. She faced body shaming and online trolling, impacting her confidence. 'Bigg Boss 17' and 'Dhurandhar' changed her fate after earlier work in 'Kis Kisko Pyaar Karoon'.
Web Summary : 'धुरंधर' के लिए मशहूर आयशा खान ने खुलासा किया कि 12वीं कक्षा में वज़न के कारण उन्हें टी-सीरीज़ के एक गाने से हटा दिया गया था। उन्होंने बॉडी शेमिंग और ऑनलाइन ट्रोलिंग का सामना किया, जिससे उनका आत्मविश्वास प्रभावित हुआ। 'बिग बॉस 17' और 'धुरंधर' ने 'किस किसको प्यार करूं' में पहले काम करने के बाद उनकी किस्मत बदल दी।