'धुरंधर' आणि 'धुरंधर २: द रिव्हेंज'च्या अभूतपूर्व यशानंतर आता प्रेक्षकांच्या नजरा या फ्रँचायझीच्या तिसऱ्या भागाकडे लागल्या आहेत. 'धुरंधर'ची कथा अद्याप संपलेली नाही असं विधान निर्मात्या ज्योती देशपांडे यांनी केलं आहे. निर्माते आता केवळ एक सीक्वेल नाही, तर संपूर्ण 'स्पाई युनिव्हर्स' तयार करण्याच्या तयारीत असून, तिसऱ्या भागात हमजाची कथा अधिक भव्य आणि डार्क पद्धतीने मांडली जाण्याची शक्यता आहे.
जिओ स्टुडिओजच्या सहनिर्मात्या ज्योती देशपांडे यांनी नुकतीच बॉलिवूड हंगामाला मुलाखत दिली. त्या म्हणाल्या, "धुरंधरची ही सिनेमा सीरिज अद्याप संपलेली नाही आणि या वर्षाच्या अखेरीस प्रेक्षकांसाठी एक मोठे सरप्राईज तयार आहे." जरी त्यांनी अधिकृतपणे 'धुरंधर ३'ची घोषणा केली नसली, तरी त्यांच्या या विधानामुळे रणवीर सिंह पुन्हा एकदा जसकीरत सिंह रंगीच्या भूमिकेत पडद्यावर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज असल्याचे संकेत मिळत आहेत.
दुसरीकडे, यामी गौतमने आपला पती आणि दिग्दर्शक आदित्य धर याच्या यशावर भाष्य करताना त्याचे कौतुक केले आहे. यामी म्हणाली की, "इतके मोठे यश मिळूनही आदित्यमध्ये कोणताही बदल झालेला नाही. तो आजही तितकाच नम्र आणि जमिनीशी जोडलेला माणूस आहे." आदित्य धरच्या दिग्दर्शनाखालील या फ्रँचायझीने ॲक्शन आणि स्पाई थ्रिलर प्रकारात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली असून, रणवीरच्या 'इंटेंस' लूकचे प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केले आहे.
कमाईच्या बाबतीतही या फ्रँचायझीने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. 'धुरंधर' आणि 'धुरंधर २'ने मिळून जगभरात ३,००० कोटी रुपयांहून अधिक गल्ला जमवला आहे, जो कोणत्याही भारतीय चित्रपट फ्रँचायझीसाठीचा आतापर्यंतचा सर्वोच्च आकडा आहे. एकटा 'धुरंधर २' परदेशात १७९० कोटींची कमाई करून अव्वल स्थानी आहे. आता या वर्षाच्या शेवटी येणारे 'सरप्राईज' नक्की काय असेल, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
Web Summary : After 'Dhurandhar's' success, producers hint at a 'spy universe' with a darker third installment. A big surprise awaits fans this year-end. The franchise boasts ₹3,000 crore worldwide earnings.
Web Summary : 'धुरंधर' की सफलता के बाद, निर्माताओं ने एक गहरे तीसरे भाग के साथ 'जासूसी ब्रह्मांड' का संकेत दिया। इस साल के अंत में प्रशंसकों के लिए एक बड़ा सरप्राइज इंतजार कर रहा है। फ्रेंचाइजी ने दुनिया भर में ₹3,000 करोड़ की कमाई की है।