रणवीर सिंग स्टारर 'धुरंधर २: द रिव्हेंज' (Dhurandhar 2) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाका केला असला तरीही, हा चित्रपट एका मोठ्या धार्मिक वादात सापडला आहे. चित्रपटातील एका सीनमध्ये 'गुरबानी'चा चुकीच्या पद्धतीने वापर केल्याचा आरोप शीख समुदायाने केला आहे. या गंभीर प्रकरणावर आता चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या आर. माधवनने स्पष्टीकरण दिले असून माफी मागितली आहे.
काय आहे नेमका वाद? 'धुरंधर २' मधील एका सीनदरम्यान आर माधवन सिगारेट पिताना गुरबानीचा उल्लेख करतो, अशी चर्चा झाली आणि शीख समुदायाने भावना दुखावण्याचा आरोप केला. अखेर या वादावर स्वतः आर माधवनने खुलासा केला. तो म्हणाला, ''तुमचा गैरसमज झाला आहे. ज्या सीनमुळे हा वाद निर्माण झाला, त्यावेळी ते संवाद बोलण्याआधीच मी सिगरेट विझवली होती. त्यामुळे त्या सीनवेळी माझ्या हातात सिगरेटही नव्हती आणि तोंडातून धूरही निघत नव्हता. शूटिंगच्या वेळी आदित्य धरने या गोष्टीची काळजी घेतलेली आणि सिगरेट तिथून हटवली होती. कोणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नव्हता. त्यामुळे कोणाच्याही धार्मिक भावना दुखावू नये याची खबरदारी घेण्यात आली होती.''
Web Summary : Despite 'Dhurandhar 2' success, controversy arose over a scene perceived as disrespecting Sikh religious sentiments. R. Madhavan clarified he did not hold a cigarette during the scene referencing 'Gurbani' and apologized if any feelings were unintentionally hurt. He affirmed respect for the Sikh community.
Web Summary : 'धुरंधर 2' की सफलता के बावजूद, एक दृश्य को लेकर विवाद हुआ जिसे सिख धार्मिक भावनाओं के प्रति अनादर माना गया। आर. माधवन ने स्पष्ट किया कि 'गुरबानी' का उल्लेख करते हुए दृश्य के दौरान उन्होंने सिगरेट नहीं पकड़ी थी और अगर किसी की भावनाओं को अनजाने में ठेस पहुंची हो तो माफी मांगी। उन्होंने सिख समुदाय के लिए सम्मान की पुष्टि की।