Join us
Daily Top 2Weekly Top 5

२० वर्षांची 'ही' मुलगी बॉलिवूड नायिकांवर पडली भारी! भन्साळींच्या सिनेमात मिळाली मुख्य भूमिका, साकारणार आयकॉनिक रोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 14:10 IST

संजय लीला भन्साळींच्या सिनेमात काम करायला मिळावं असं प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं. अशातच बॉलिवूडमधील एका नवख्या अभिनेत्रीच्या त्यांच्या सिनेमात काम करण्याची संधी मिळाली आहे.

Sara Arjun: आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर २' मध्ये मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारून अभिनेत्री सारा अर्जुन चांगलाच भाव खाऊन गेली. या चित्रपटाच्या यशानंतर सारा अर्जुन प्रसिद्धीझोतात आली आहे. पहिल्याच चित्रपटातून तिने सर्वाचं लक्ष वेधून घेतलं आहे. या चित्रपटानंतर साराच्या हाती एक बिग बजेट सिनेमा लागला आहे.धुरंधर २ मध्ये यालिनाची भूमिका साकारल्यानंतर, सारा अर्जुन आता संजय लिला भन्साळींच्या चित्रपटात दिसणार असल्याची अपडेट मिळते आहे. 

मिडिया रिपोर्टनुसार, सारा अर्जुन आता हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री मधुबाला यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. संजय लीला भन्साळी हे बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध दिग्दर्शक आहेत. बिग बजेट सिनेमांसाठी ते ओळखले जातात.संजय लीला भन्साळींच्या सिनेमात काम करायला मिळावं असं प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं. आता साराला मधुबालांसारख्या दिग्गज अभिनेत्रीची भूमिका पडद्यावर साकारण्याची संधी मिळणार आहे, जो तिच्या करिअरसाठी टर्निंग पॉइंट ठरू शकतो.  मधुबालायांच्यासारख्या  आयकॉनिक अभिनेत्रीची भूमिका पडद्यावर साकारणं हसाकारणं हे कोणत्याही कलाकारासाठी मोठं आव्हानच आहे.

दरम्यान, या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा जसमीत रीन  यांच्या खांद्यावर आहे. तर  संजय लीला भन्साळी या चित्रपटाचे निर्माते आहेत.जसमीत के. रीन यांनी यापूर्वी आलिया भट्ट आणि विजय वर्मा स्टार 'डार्लिंग्स' या चित्रपटासाठी आजही ओळखल्या जातात. त्यावेळी या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, या चित्रपटाचं यावर्षाच्या शेवटी शूटिंग सुरू होण्याची शक्यता आहे.  यामुळे प्रेक्षक देखील उत्सुक आहेत. मात्र, याबाबत सारा अर्जुन किंवा निर्मात्यांकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

या अभिनेत्रींच्या नावाचीही होती चर्चा...

आपल्या सौंदर्याने आणि सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर दीर्घकाळ राज्य करणाऱ्या या नायिकेच्या जीवनावर आधारित चित्रपट बनणार आहे. शिवाच चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर त्यामध्ये अभिनेत्री किआरा अडवाणी मधुबाला यांच्या भूमिकेत झळकणार असल्याची बातम्या कानावर येत होत्या. त्यानंतर या प्रोजेक्टसाठी सैयारा फेम अभिनेत्री अनीत पड्डाचं नाव समोर आलं होतं. मात्र, या केवळ अफवा असल्याचं समोर आलं.

English
हिंदी सारांश
Web Title : Sara Arjun to play Madhubala in Sanjay Leela Bhansali's film!

Web Summary : Sara Arjun, after 'Dhurandar 2' success, will portray Madhubala in Sanjay Leela Bhansali's upcoming film, directed by Jasmita Reen. This iconic role could be a turning point for her career, although official confirmation is awaited.
टॅग्स :सारा अर्जुनधुरंधर सिनेमाबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमा