Sara Arjun Upcoming Cinema: आदित्य धर दिग्दर्शित धुरंधर या चित्रपटामुळे सारा अर्जुन हे नाव चांगलच प्रसिद्धीझोतात आलं आहे. नुकताच या सिनेमाचा सीक्वल प्रेक्षकांच्या भेटीला आला असून त्याला सिनेप्रेमींचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. चित्रपटातील रणवीरच्या कामाचं सर्वत्र कौतुक होतंय. त्याचबरोबर 'धुरंधर: द रिव्हेंज' या चित्रपटात मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारून सारा अर्जुनने देखील प्रेक्षकांच्या मनावर गारुड घातलंय. रणवीर सिंगसोबतची तिची केमिस्ट्री अनेकांच्या पसंतीस उतरली आहे. एकीकडे धुरंधर २ चं यश अनुभवत असताना सारा अर्जुनला मोठी संधी मिळाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार साराला आणखी एक बिग बजेट प्रोजेक्टची संधी मिळाली आहे.
सारा अर्जुन तिच्या करिअरच्या एका उत्तम टप्प्यातून जात आहे. गल्फ न्यूजच्या वृत्तानुसार, सारा अर्जुनला झोया अख्तरच्या आगामी चित्रपटाची ऑफर मिळाली आहे. सारा आता झोया अख्तरच्या 'टायगर बेबी' बॅनरखाली बनणाऱ्या चित्रपटात दिसणार असल्याचं बोललं जातंय. या चित्रपटात सारा अर्जुन आणि ईशान खट्टरसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. अर्जुन वरैन सिंग या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.दरम्यान, याबाबत जोया अख्तर किंवा सारा अर्जुनकडून कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
दरम्यान, सारा अर्जुनची मुख्य भूमिका असलेला'धुरंधर: द रिव्हेंज' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत आहे. या चित्रपटाने जगभरात १००० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. या चित्रपटात संजय दत्त, अर्जुन रामपाल, आर. माधवन आणि राकेश बेदी यांसारखे दिग्गज कलाकारही आहेत.
Web Summary : Following 'Dhurandhar 2' success, Sara Arjun may star in Zoya Akhtar's 'Tiger Baby' film with Ishaan Khattar, directed by Arjun Varain Singh. Box office hit 'Dhurandhar: The Revenge' stars Sanjay Dutt and others.
Web Summary : 'धुरंधर 2' की सफलता के बाद, सारा अर्जुन ज़ोया अख्तर की 'टाइगर बेबी' फिल्म में ईशान खट्टर के साथ, अर्जुन वरैन सिंह द्वारा निर्देशित, अभिनय कर सकती हैं। बॉक्स ऑफिस हिट 'धुरंधर: द रिवेंज' में संजय दत्त और अन्य कलाकार हैं।