Join us
Daily Top 2Weekly Top 5

Dhurandhar 2: रणवीर सिंगच बॉक्स ऑफिसचा बादशाह! रिलीजआधीच 'धुरंधर २'ने कमावले 'इतके' कोटी, सगळेच थक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 14:52 IST

बॉलिवूडचा सुपरस्टार रणवीर सिंग सध्या त्याच्या आगामी 'धुरंधर: द रिव्हेंज' (Dhurandhar: The Revenge) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच बॉक्स ऑफिसवर नवनवीन विक्रम प्रस्थापित करत आहे

बॉलिवूडचा सुपरस्टार रणवीर सिंग सध्या त्याच्या आगामी 'धुरंधर: द रिव्हेंज' (Dhurandhar: The Revenge) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच बॉक्स ऑफिसवर नवनवीन विक्रम प्रस्थापित करत आहे. या चित्रपटाने जागतिक स्तरावर (Worldwide) ॲडव्हान्स बुकिंगमध्ये १०० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला असून एक नवा इतिहास रचला आहे.

ॲडव्हान्स बुकिंगमध्ये विक्रमी कमाई

रणवीर सिंगच्या या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे. केवळ भारतातच नव्हे, तर अमेरिका, ब्रिटन आणि आखाती देशांमध्येही या चित्रपटाची तिकिट घेण्यासाठी प्रेक्षकांनी उत्सुकता दाखवली आहे. याचाच फायदा 'धुरंधर २'च्या कमाईवर झालेला दिसतोय. प्रदर्शनाच्या काही दिवस आधीच १०० कोटींची कमाई करणे, ही 'धुरंधर २' साठी मोठी गोष्ट आहे. एकूणच देशभरात नव्हे तर जगभरात 'धुरंधर'ची किती हवा हेच यातून दिसून येतं. अनेक दिवसांनी बॉलिवूड सिनेमाबद्दल लोकांच्या मनात इतकी क्रेझ दिसून येतेय.

गेल्या काही काळापासून रणवीर सिंग एका मोठ्या हिटच्या शोधात होता आणि 'धुरंधर २'च्या निमित्ताने रणवीर बॉक्स ऑफिसचा बादशाह झालाय असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. चित्रपटाचा ट्रेलर आणि गाण्यांना मिळालेल्या प्रतिसादानंतर आता बॉक्स ऑफिसचे आकडेही थक्क करणारे आहेत. 'धुरंधर: द रिव्हेंज' हा एक हाय-ऑक्टेन ॲक्शन ड्रामा असल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये रणवीर पुन्हा एकदा हमजा अलीच्या आक्रमक रूपात दिसणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Ranveer Singh's 'Dhurandhar 2' earns crores pre-release, stuns all!

Web Summary : Ranveer Singh's upcoming film 'Dhurandhar 2' is creating records before release. The action drama has already grossed ₹100 crore in worldwide advance bookings, showcasing huge anticipation in India, America, and the Gulf countries, solidifying Singh's box office dominance.
टॅग्स :धुरंधर सिनेमाबॉलिवूडरणवीर सिंगयामी गौतमअक्षय खन्ना