Dhurandhar 2: आदित्य धरचं दिग्दर्शन असलेला 'धुरंधर : द रिव्हेंज' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. रणवीर सिंह, संजय दत्त, सारा अर्जुन, आर माधवन, अर्जुन रामपाल अशी स्टारकास्ट असलेला 'धुरंधर २' रोज नवे रेकॉर्ड बनवत आहे. अनेक सेलिब्रिटींनी 'धुरंधर २'चं कौतुक केलं आहे. बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर यानेदेखील 'धुरंधर २'साठी भली मोठी पोस्ट लिहिली आहे.
'धुरंधर २'साठी करण जोहरची पोस्ट
"टेस्टोस्टेरॉन, हायपर अल्फा एनर्जी आणि खोलवर रुजलेला देशभक्तीभाव यावर चर्चा सुरूच राहतील आणि त्या व्हायलाही हव्यात. पण 'धुरंधर २' त्यापेक्षा खूप काही अधिक आहे. जसकीरतची हृदय पिळवटून टाकणारी कथा, आपल्या मातृभूमीसाठी दिलेलं वेदनादायक बलिदान, खलनायकाचं पात्रही बहुआयामी आहे. अफलातून कारागिरी, साउंडस्केप आणि एकूणच सिनेमॅटिक दमदारपणा हे सगळं आदित्य धरच्या दिग्दर्शनातील कमाल दाखवतं. तो एक भन्नाट, अप्रतिम दिग्दर्शक आहे. हा एक नवा दिग्दर्शक आहे जो बॉक्स ऑफिसचे सगळे रेकॉर्ड तो मोडणार आणि नवे रेकॉर्ड बनवणार", असं म्हणत त्याने आदित्य धरचं कौतुक केलं आहे.
रणवीर सिंगचं केलं कौतुक
करण जोहर म्हणतो, "आणि रणवीर सिंग तू काय आहेस यार!! तुझ्या करिअरमधील हा सर्वोत्तम परफॉर्मन्स आहे. प्रत्येक अश्रू, प्रत्येक शांत कटाक्ष, प्रत्येक क्षण, तुझी चाल, हे सिद्ध करते की तू सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक आहेस. तू येणाऱ्या अनेक वर्षांसाठी खरा 'धुरंधर' चित्रपट स्टार म्हणून ओळखला जाशील".
"मला ७० च्या दशकातील सिंगल स्क्रीनमध्ये पाहिलेल्या त्या दमदार हिंदी सिनेमाच्या दिवसांची आठवण झाली आणि मी पूर्णपणे समाधानी होऊन बाहेर पडलो. या क्षेत्राचा भाग होण्याचं स्वप्न पाहिलं होतं. आणि आज मी या क्षेत्राचा भाग आहे. ‘धुरंधर’ने पुन्हा एकदा मला जाणवून दिलं की इथे असल्याचा मला किती अभिमान आणि कृतज्ञता आहे", असंही पुढे त्याने म्हटलं आहे.
Web Summary : Karan Johar lauded 'Dhurandhar 2,' praising director Aditya Dhar and Ranveer Singh's performance. He called Singh a true 'Dhurandhar' star, highlighting the film's patriotism, Jasrat's story, and cinematic brilliance, evoking nostalgia for classic Hindi cinema.
Web Summary : करण जौहर ने 'धुरंधर 2' की प्रशंसा की, निर्देशक आदित्य धर और रणवीर सिंह के प्रदर्शन की सराहना की। उन्होंने सिंह को एक सच्चा 'धुरंधर' स्टार कहा, फिल्म की देशभक्ति, जस्रत की कहानी और सिनेमाई प्रतिभा पर प्रकाश डाला, जिससे क्लासिक हिंदी सिनेमा की यादें ताजा हो गईं।