Join us
Daily Top 2Weekly Top 5

Dhurandhar 2: रिलीजला काहीच तास बाकी असताना 'धुरंधर' दिग्दर्शक आदित्य धरची पोस्ट चर्चेत, म्हणाला- "त्यात मजा नाही"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 15:02 IST

सिनेमा रिलीज व्हायला काहीच तास बाकी असताना 'धुरंधर २'चा दिग्दर्शक आदित्यने केलेली पोस्ट चर्चेत आहे. त्यामुळे चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत

'धुरंधर २' सिनेमाची खूप चर्चा आहे. अनेक वर्षांनंतर एका बॉलिवूड सिनेमाची इतकी हवा बघायला मिळतेय. आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर'चा पहिला भाग डिसेंबर २०२५ ला रिलीज झाला होता. याच भागाच्या शेवटी आदित्यने 'धुरंधर २'ची घोषणा केली. आता ठरलेल्या तारखेनुसार म्हणजे १९ मार्चला हा सिनेमा रिलीज होतोय. याशिवाय आज १८ मार्चला देशातील काही ठिकाणी 'धुरंधर'चे पेड प्रीव्ह्यू शो आहेत. सिनेमा रिलीज व्हायला काहीच तास बाकी असताना 'धुरंधर २'चा दिग्दर्शक आदित्यने केलेली पोस्ट चर्चेत आहे.आदित्य धरने इन्स्टाग्रामवर लांबलचक पोस्ट लिहिली आहे. यात तो लिहितो की, ''आम्ही 'धुरंधर: द रिवेंज' बनवण्यासाठी आमचं सर्वस्व पणाला लावलं आहे, जेणेकरून तुम्हाला कथेतील प्रत्येक वळण आणि प्रत्येक भावना अगदी तशीच जाणवेल, जशी ती अनुभवायला हवी. चित्रपटगृहातील अंधारात, मित्र-परिवार आणि अनोळखी लोकांसोबत बसून जेव्हा प्रत्येक जण एकाच प्रकारच्या भावना अनुभवत असतो, तेव्हाचा तो अनुभव काही वेगळाच असतो."

आदित्य धरने पुढे लिहिले की, "कोणताही चित्रपट याच पद्धतीने पाहायला हवा. कोणीतरी फोनवरुन शूट केलं आणि तुम्ही तो व्हिडीओ पाहताय, तर त्यात मजा नाही. म्हणूनच, माझी तुम्हा सर्वांना मनापासून विनंती आहे की, कृपया 'स्पॉयलर्स' शेअर करू नका! प्रत्येक चाहत्याला चित्रपटाबद्दल काहीही माहित नसताना, त्याच उत्सुकतेने चित्रपट पाहण्याची संधी द्या, कारण प्रत्येक चाहत्याची भावना या चित्रपटाशी जोडलेली आहे.", अशी भावनिक पोस्ट आदित्य धरने लिहिली आहे. एकूणच जो प्रेक्षक सिनेमा बघेल त्याने काहीही शूट करुन सोशल मीडियावर पोस्ट करु नये. जेणेकरुन इतर लोकांचा अपेक्षाभंग होईल.

English
हिंदी सारांश
Web Title : 'Dhurandhar 2' director Aditya Dhar's post goes viral before release.

Web Summary : Ahead of 'Dhurandhar 2' release, director Aditya Dhar urged viewers to avoid sharing spoilers. He emphasized the unique experience of watching films in theaters and preserving suspense for all fans.
टॅग्स :धुरंधर सिनेमारणवीर सिंगयामी गौतमबॉलिवूड