Join us
Daily Top 2Weekly Top 5

जास्त पैसे खर्च न करता 'धुरंधर २' स्वस्तात बघायचाय? 'या' ठिकाणी तिकिटाची किंमत आहे सर्वात कमी, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 08:59 IST

रणवीर सिंग आणि आदित्य धर यांचा बहुप्रतिक्षित ॲक्शन चित्रपट 'धुरंधर २: द रिव्हेंज' सध्या बॉक्स ऑफिसवर धमाका करण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाची Advance Booking सुरू झाली असून चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे

रणवीर सिंग आणि आदित्य धर यांचा बहुप्रतिक्षित ॲक्शन चित्रपट 'धुरंधर २: द रिव्हेंज' सध्या बॉक्स ऑफिसवर धमाका करण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाची Advance Booking सुरू झाली असून चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. एकीकडे मुंबई आणि दिल्लीसारख्या शहरांमध्ये तिकिटांचे दर गगनाला भिडले असताना, नोएडातील एका थिएटरमध्ये मात्र तुलनेने स्वस्त तिकिट मिळत आहे.

बूक माय शोकडे नजर टाकली तर, मुंबईतील काही थिएटर्समध्ये एका तिकिटाची किंमत ३१०० रुपयांपर्यंत पोहोचली आहे. दिल्लीतही हे दर २४०० रुपयांच्या आसपास आहेत. मात्र, नोएडातील 'मूवीटाइम सिनेमा' (Movietime Cinemas, Sector 18) येथे प्रेक्षकांसाठी सर्वात स्वस्त तिकिटं उपलब्ध आहेत. या थिएटरमध्ये अवघ्या ३०० रुपयांत प्रेक्षक 'धुरंधर २'चा आनंद घेऊ शकतात.

नोएडातील इतर काही स्वस्त पर्याय

  • मोदी मॉल: ४०० ते ४१० रुपये.

  • वेव्ह सिनेमा: ४०० रुपये.

  • मिराज सिनेमा, TGIP: ४०० रुपये.

हा चित्रपट अधिकृतपणे १९ मार्च २०२६ रोजी प्रदर्शित होणार असला, तरी निर्मात्यांनी १८ मार्च रोजी विशेष 'पेड प्रिव्ह्यू' (Paid Previews) शोज आयोजित केले आहेत. नोएडातील स्वस्त दरातील शोज संध्याकाळी ५ वाजेपासून सुरू होणार असून रात्री उशिरा १०:३० वाजेपर्यंत हे शो चालणार आहेत. 'धुरंधर २' चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच ॲडव्हान्स बुकिंगमध्ये २१ कोटींहून अधिक कमाई केली आहे.

जवळपास ३ लाख तिकिटांची विक्री झाली असून या चित्रपटाने 'स्त्री २' चे रेकॉर्ड मोडले असल्याचे बोलले जात आहे. रणवीर सिंगसोबतच या चित्रपटात संजय दत्त, आर. माधवन, अर्जुन रामपाल यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Affordable 'Dhurandhar 2': Cheapest Tickets in Noida, Details Here!

Web Summary : Eager fans can watch 'Dhurandhar 2' affordably in Noida. Ticket prices in Mumbai reach ₹3100, but Noida's Movietime Cinemas offers tickets for ₹300. Paid previews start March 18th. The film has already earned over ₹21 crore in advance bookings.
टॅग्स :धुरंधर सिनेमारणवीर सिंगसंजय दत्तअर्जुन रामपालसारा अर्जुनबॉलिवूड