आदित्य धर दिग्दर्शित आणि रणवीर सिंगची भूमिका असलेला 'धुरंधर २: द रिव्हेंज' हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर ऐतिहासिक कमाई करत आहे. अवघ्या पाच दिवसांत या चित्रपटाने ५०० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला असून जगभरात या चित्रपटाची चर्चा आहे. मात्र, याच चित्रपटात काम करणाऱ्या एका कलाकाराची व्यथा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांच्या डोळ्यात पाणी आणत आहे.
या चित्रपटाच्या शेवटच्या सीनमध्ये रणवीर सिंगला त्याच्या घरापर्यंत सोडणाऱ्या रिक्षाचालकाची भूमिका एका सामान्य कलाकाराने साकारली आहे. नुकत्याच एका मुलाखतीत जेव्हा त्याला विचारण्यात आले की, त्याने स्वतःचा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन पाहिला का? तेव्हा त्याने दिलेल्या उत्तराने सर्वांना भावुक केलं.
तो कलाकार म्हणाला, "नाही साहेब, मी अजून चित्रपट पाहिलेला नाही. सध्या चित्रपट नवीन आहे आणि तिकिटाचे दर ५०० रुपयांच्या आसपास आहेत. ५०० रुपये खर्च करून मी माझाच चित्रपट पाहू शकेन, इतकी माझी ऐपत नाही."
जेव्हा त्याला विचारले की घरातील मुलांनी चित्रपट पाहण्याचा हट्ट केला नाही का? त्यावर तो म्हणाला, "मुलांनी हट्ट केला होता, पण आम्ही कुटुंबात पाच जण आहोत. पाच जणांच्या तिकिटांचे एकूण २५०० रुपये होतात. हे २५०० रुपये म्हणजे आमच्या संपूर्ण महिन्याची बचत आहे. त्यामुळे मी मुलांना समजावले की थोडे दिवस थांबा, गर्दी कमी झाली आणि तिकिटांचे दर कमी झाले की आपण नक्की जाऊ."
कोणतीही तक्रार न करता अत्यंत प्रामाणिकपणे त्याने मांडलेली ही परिस्थिती पाहून चाहते भावुक झाले आहेत. एकीकडे चित्रपट शेकडो कोटींची कमाई करत असताना, दुसरीकडे त्याच चित्रपटातील एका कलाकाराला आपल्या कुटुंबासह तो चित्रपट पाहणं परवडत नाहीये. सोशल मीडियावर नेटकरी या कलाकाराच्या साधेपणाचं आणि स्ट्रगलचं कौतुक करत असून काहींनी त्याला तिकीट मिळवून देण्यासाठी मदत करण्याची इच्छाही व्यक्त केली आहे.
Web Summary : Despite 'Dhurandhar 2' success, a supporting actor reveals he can't afford the ₹500 ticket to watch the film with his family, highlighting the contrast between box office success and the struggles of ordinary artists. Fans are touched by his humility.
Web Summary : 'धुरंधर 2' की सफलता के बावजूद, एक सहायक अभिनेता ने खुलासा किया कि वह अपने परिवार के साथ फिल्म देखने के लिए ₹500 का टिकट नहीं खरीद सकते, जिससे बॉक्स ऑफिस की सफलता और आम कलाकारों के संघर्षों के बीच का अंतर उजागर होता है। प्रशंसक उनकी विनम्रता से अभिभूत हैं।