Join us

सनी देओल-शाहरुखच्या गळाभेटीनंतर धर्मेंद्र यांनी दिल्या किंग खानला शुभेच्छा, म्हणाले,'बेटे...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2023 17:13 IST

किंग खानला मिळाली 'ही-मॅन'ची साथ

बॉलिवूडचे अच्छे दिन परत आले आहेत असं म्हणायला हरकत नाही. सनी देओलच्या 'गदर 2' ने बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घातलाय. त्याआधी शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) 'पठाण' ने तुफान यश मिळवलं होतं. आता किंग खानच्या आगामी 'जवान' (Jawan)सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकतंच सनी देओलने (Sunny Deol) 'गदर 2' च्या सक्सेस निमित्त ग्रँड पार्टीचं आयोजन केलं होतं. यामध्ये ३० वर्षांचे मतभेद विसरुन शाहरुख आणि सनी देओलने गळाभेट घेतली. आता धर्मेंद्र (Dharmendra) यांनी शाहरुखला शुभेच्छा दिल्या आहेत.

शाहरुख खानच्या 'जवान' सिनेमासाठी धर्मेंद्र यांनी खास पोस्ट केली आहे. त्यांनी शाहरुखसोबतचा एक फोटो पोस्ट केला. त्याखाली कॅप्शनमध्ये लिहिले,'शाहरुख बेटे, जवानसाठी तुला खूप खूप शुभेच्छा'. त्यांच्या या फोटोला चाहत्यांनी लाईक केलं असून कमेंट्सचा वर्षाव केलाय. 

'गदर 2'च्या सक्सेस पार्टीनंतर जिकडे तिकडे किंग खान आणि सनी देओलचीच चर्चा आहे. ३० वर्षांपूर्वी आलेल्या 'डर' सिनेमावेळी झालेले मतभेद विसरुन दोघांनी गळाभेट घेतली. पार्टीत सलमान, शाहरुख आणि आमिर हे तीनही खान एकत्र दिसले. अख्खं बॉलिवूड पार्टीत सहभागी झालं होतं. आता शाहरुखला बॉलिवूडच्या हिमॅनच्याच शुभेच्छा मिळाल्या आहेत. त्यामुळे 'जवान' रेकॉर्डब्रेक कामगिरी करतो का हे बघणं महत्वाचं आहे. उद्या ७ सप्टेंबर रोजी सिनेमा रिलीज होतोय.

टॅग्स :धमेंद्रशाहरुख खानबॉलिवूडजवान चित्रपट