हिंदी सिनेसृष्टीचे ही-मॅन, सर्वात देखणे हिरो धर्मेंद्र यांनी २४ नोव्हेंबर रोजी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाने सिनेसृष्टीत कायमची पोकळी निर्माण झाली. धर्मेंद्र यांचं कुटुंब दु:खात आहे. त्यांना सहा मुलं आहेत. पहिली पत्नी प्रकाश कौरपासून दोन मुलं आणि दोन मुली आहेत. तर हेमा मालिनी यांच्यापासून ईशा आणि अहाना या दोन मुली आहेत. धर्मेंद्र यांच्या संपत्तीतून आहाना देओलला फक्त एकच गोष्ट हवी असल्याचं तिने सांगितलं होतं. कोणती आहे ती गोष्ट?
HerZindagiBuzz ला दिलेल्या मुलाखतीत अहाना देओल म्हणालेली की, "जर मला माझ्या वडिलांच्या वारसा संपत्तीतून काही हवं असेल तर मला त्यांची पहिली Fiat कार घ्यायला आवडेल. ती कार खूपच छान आणि व्हिंटेज आहे. माझ्यासाठी ती फक्त कार नाही तर त्याच्याशी वडिलांसोबतच्या अनेक आठवणी जोडलेल्या आहेत."
पुढे आहानाने वडिलांसोबतची एक आठवणही सांगितली. ती म्हणालेली,"मी सहा वर्षांची होते. एक दिवस वडील लोणावळ्याला आमच्या फार्म हाऊसवर जायला निघत होते. आम्हाला बाय बाय करण्यासाठी ते थांबले. तेव्हाच मी अचानक त्यांना म्हणाले,'मलाही तुमच्यासोबत यायचं आहे.' मग त्यांनी लगेच माझी बॅग भरली आणि मला सोबत घेऊन गेले. कारमध्ये त्यांनी मला मांडीवर बसवलं. त्यांच्यासोबतची ती माझी सर्वात छान आठवण आहे. ही आठवण माझ्या मनात कायम राहील."
ती पुढे म्हणाली, "आईवडिलांना पडद्यावर दुसऱ्यांसोबत रोमान्स करताना पाहणं मला अजिबातच आवडायचं नाही. लहानपणी ते पाहून मला फार राग यायचा. माझी आई हेमा मालिनी मला समजवायची की हा तिच्या कामाचा भाग आहे. पण सुरुवातीला मला ते समजून घेणं खूप कठीण गेलं."
Web Summary : Ahana Deol desires her father Dharmendra's vintage Fiat car, cherishing memories associated with it. She recalled a Lonavala trip, highlighting their strong bond. As a child, she disliked seeing her parents romance others on screen, struggling to accept it as work.
Web Summary : अहाना देओल को अपने पिता धर्मेंद्र की विंटेज फिएट कार चाहिए, जिससे जुड़ी यादें उनके दिल में बसी हैं। उन्होंने लोनावाला की यात्रा को याद किया, जो उनके मजबूत बंधन को दर्शाती है। बचपन में, उन्हें अपने माता-पिता को स्क्रीन पर रोमांस करते देखना पसंद नहीं था, और इसे काम के तौर पर स्वीकार करने में मुश्किल हुई।