Dharmendra Last Movie Ikkis Ott Released : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र आता या जगात नाहीत. २४ नोव्हेंबर २०२५ या दिवशी त्यांचं निधन झालं. धर्मेंद्र यांनी त्यांच्या मुंबईतील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. धर्मेंद्र या जगात नसले तरीही ते आपल्या कलाकृतींमधून कायम जिवंत राहतील. आता धर्मेंद्र यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. धर्मेंद्र यांचा शेवटचा चित्रपट 'इक्कीस' ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. तुम्ही घरबसल्या या चित्रपटाचा आनंद घेऊ शकणार आहात.
धर्मेंद्र आणि नवोदित अभिनेता अगस्त्य नंदा यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट १ जानेवारी २०२६ या दिवशी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. ६० कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या चित्रपटाने जगभरात सुमारे ३३ ते ४१ कोटींचं कलेक्शन गोळा केलं. आता 'इक्कीस' चित्रपट अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ (Amazon Prime Video) वर स्ट्रीम झाला आहे. प्राइम सबस्क्राइबर्सना आता हा चित्रपट कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय मोफत पाहता येणार आहे.
भारतीय सैन्यातील धाडसी अधिकारी सेकंड लेफ्टनंट अरुण खेत्रपाल यांच्या शौर्याची गाथा सांगणारा हा चित्रपट आहे. अरुण खेत्रपालच्या भूमिकेत अगस्त्य नंदा आहे. तर धर्मेंद्र यांनी अरुण खेत्रपाल यांच्या वडिलांची, ब्रिगेडियर मदन लाल खेत्रपाल यांची भूमिका अत्यंत प्रभावीपणे साकारली आहे. 'इक्कीस' हा धर्मेंद्र यांचा तो शेवटचा चित्रपट ठरला. त्यांच्या निधनानंतर हा चित्रपट प्रदर्शित झाला, त्यामुळे थिएटरमध्ये त्यांना मोठ्या पडद्यावर पाहताना चाहते अत्यंत भावूक झाले होते.
'इक्कीस' या चित्रपटाचं दिग्दर्शन श्रीराम राघवन यांनी केलं आहे. चित्रपटात धर्मेंद्र आणि अगस्त्य नंदासह जयदीप अहलावत, राहुल देव, सिमर भाटिया, दीपक डोब्रियाल, विवान शाह, सिकंदर खेर, श्री बिश्नोईसारखे अनेक कलाकार या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
Web Summary : Dharmendra's final movie, 'Ikkis,' co-starring Agastya Nanda, now streams on Amazon Prime. Released in theaters January 1, 2026, it portrays Second Lieutenant Arun Khetarpal's bravery. Dharmendra plays his father. Fans are emotional seeing him on screen again.
Web Summary : धर्मेंद्र की आखिरी फिल्म 'इक्कीस', जिसमें अगस्त्य नंदा भी हैं, अब अमेज़न प्राइम पर स्ट्रीम हो रही है। 1 जनवरी, 2026 को सिनेमाघरों में रिलीज़ हुई, यह फिल्म सेकंड लेफ्टिनेंट अरुण खेत्रपाल की बहादुरी को दर्शाती है। धर्मेंद्र ने उनके पिता की भूमिका निभाई है। प्रशंसक उन्हें फिर से स्क्रीन पर देखकर भावुक हैं।