Join us
Daily Top 2Weekly Top 5

दोन लग्नांनंतरही 'या' बॉलिवूड अभिनेत्रीच्या प्रेमात पडलेले धर्मेंद्र, हेमा मालिनींना कळलं अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2023 13:28 IST

हेमा मालिनींशी लग्न केल्यानंतरही तिसऱ्यांदा प्रेमात पडलेले धर्मेंद्र, पण...

बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांनी अनेक वर्ष बॉलिवूडवर राज्य केलं. ७०-८०च्या दशकातील त्यांचे सिनेमे प्रचंड गाजले. अभिनयाप्रमाणेच धर्मेंद्र त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिले आहेत. विवाहित असलेल्या धर्मेंद्र यांनी सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी यांच्याशी दुसरं लग्न केलं होतं. दोन लग्न केल्यानंतर धर्मेंद तिसऱ्यांदा प्रेमात पडले होते. 

धर्मेंद्र यांनी १९५४ साली अवघ्या १९व्या वर्षी प्रकाश कौर यांच्याबरोबर लग्न केलं होतं. ८०च्या दशकात धर्मेंद्र व हेमा मालिनी एकमेकांना भेटले. हेमा मालिनी यांना पाहताच विवाहित असलेले धर्मेंद्र त्यांच्या प्रेमात पडले होते. हेमा मालिनी यांच्याशी लग्न करण्यासाठी धर्मेंद्र यांनी मुस्लीम धर्मही स्वीकारला होता. त्यानंतर १९८० साली धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्याशी दुसरं लग्न केलं. दोन लग्नानंनतरही एका अभिनेत्रीवर धर्मेंद्र यांचा जीव जडला होता. 

"राज ठाकरे यारों का यार", अतुल परचुरेंचं वक्तव्य, म्हणाले, "त्याने एकदा फोन करुन..."

मीडिया रिपोर्टनुसार, धर्मेंद्र बॉलिवूड अभिनेत्री अनिता राज यांच्या प्रेमात पडले होते. त्यांनी 'जलजला', 'करिश्मा कुदरत का', 'इंसानियत के दुश्मन', 'नौकर बीवी का' या चित्रपटांत एकत्र काम केलं होतं. याचदरम्यान धर्मेंद्र आणि अनिता राज यांच्यातील जवळीक वाढली होती. धर्मेंद्र यांनी त्यांच्या चित्रपटात अनिता राज यांना घेण्याचा सल्लाही निर्मात्यांना दिला होता. 

३१ वर्षांपूर्वीच झालेली किंग खान सुपरस्टार होणार असल्याची भविष्यवाणी, हेमा मालिनी यांचा खुलासा

धर्मेंद्र आणि अनिता राज यांच्या नात्याबाबत हेमा मालिनी यांना कळलं होतं. हेमा मालिनींमुळे धर्मेंद्र यांनी अनिता राज यांच्यापासून अंतर ठेवल्याचं बोललं जातं. त्यांच्यामुळे धर्मेंद्र आणि अनिता राज यांचं नात तुटलं.  

टॅग्स :धमेंद्रबॉलिवूडहेमा मालिनी