Join us
Daily Top 2Weekly Top 5

"माझं काळीज तुटलंय...", स्मशानभूमीबाहेर धाय मोकलून रडली धर्मेंद्र यांची चाहती, काळजाला चर्रर्र करणारा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 11:06 IST

धर्मेंद्र यांच्या पार्थिवावर विलेपार्ले येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. सनी देओलने त्यांना मुखाग्नी दिला. पण, निधनानंतर धर्मेंद्र यांची अंत्ययात्रा न काढल्याने त्यांचे चाहते नाराज आहेत. धर्मेंद्र यांना शेवटचं पाहण्यासाठी त्यांच्या चाहत्यांनी स्मशानभूमीबाहेर गर्दी केली होती. अशाच एका चाहतीचा व्हिडीओ समोर आला आहे.

Dharmendra Passed Away: बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं सोमवारी(२४ नोव्हेंबर) निधन झालं. मुंबईतील जुहू येथील राहत्या घरात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ८९व्या वर्षी धर्मेंद्र यांनी या जगाचा निरोप घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या प्रकृतीत बिघाड होत असल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र नंतर त्यांची प्रकृती सुधारल्याने धर्मेंद्र यांना घरी सोडण्यात आलं होतं. त्यानंतर धर्मेंद्र यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. अखेर काल त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. 

धर्मेंद्र यांच्या पार्थिवावर विलेपार्ले येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. सनी देओलने त्यांना मुखाग्नी दिला. पण, निधनानंतर धर्मेंद्र यांची अंत्ययात्रा न काढल्याने त्यांचे चाहते नाराज आहेत. धर्मेंद्र यांना शेवटचं पाहण्यासाठी त्यांच्या चाहत्यांनी स्मशानभूमीबाहेर गर्दी केली होती. अशाच एका चाहतीचा व्हिडीओ समोर आला आहे. धर्मेंद्र यांच्या निधनाने त्यांच्या चाहत्यांनी स्मशानभूमीबाहेर टाहो फोडला आहे. "माझं काळीज तुटलंय...आम्हाला शेवटचा चेहरा नाही दाखवला", असं म्हणत एक महिला धाय मोकलून रडत असल्याचं दिसत आहे. धर्मेंद्र यांना शेवटचंही पाहता न आल्याने त्यांना अश्रू अनावर झाले आहेत. 

धर्मेंद्र यांनी जवळपास ३०० हून अधिक सिनेमांमध्ये काम केलं होतं. वयाची नव्वदी गाठली तरी ते बॉलिवूडमध्ये सक्रिय होते. १९६० साली अभिनयात पदार्पण केलेल्या धर्मेंद्र यांनी ६ दशकं प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. त्यांच्या आगामी सिनेमाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित करण्यात आला होता. धर्मेंद्र हे 'इक्कीस' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार होते. हाच त्यांचा शेवटचा सिनेमा ठरला. धर्मेद्र यांनी गेली  अनेक वर्ष त्यांच्या अभिनयाने बॉलिवूडवर राज्य केलं. बॉलिवूडचे ही मॅन म्हणून धर्मेंद्र यांची ओळख होती. शोले, बंदिनी, हकीकत, मेरा कसूर क्या है, काजल, आकाशदीप,  देवर अशा विविध सिनेमांमध्ये त्यांनी वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या. धर्मेंद्र यांचे अलीकडेच रॉकी और रानी की प्रेम कहानी आणि तेरी बातों में ऐसा उलझा जिया हे दोन सिनेमे रिलीज झाले  होते. दोन्ही सिनेमांना बॉक्स ऑफिसवर सुपरहिट यश मिळालं.

English
हिंदी सारांश
Web Title : Dharmendra's fan cries inconsolably at cremation: 'My heart is broken'

Web Summary : Veteran actor Dharmendra passed away at 89. A heartbroken fan outside the crematorium lamented not seeing him one last time. He acted in 300+ films, and his recent films were box office hits.
टॅग्स :धमेंद्रसेलिब्रिटीमृत्यू