Join us

सावळ्या रंगामुळे मिळालं रिजेक्शन; मराठी अभिनेत्रीला करावा लागलेला वर्णभेदाचा सामना, म्हणाली-"मोलकरणीच्या भूमिका..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 12:17 IST

"कायम मोलकरणीच्या भूमिका..." ; मराठमोळ्या अभिनेत्रीने सांगितला 'तो' अनुभव, म्हणाली...

Manjiri Pupala: मनोरंजन विश्वात काम करत असताना अनेकदा कलाकारांना चांगले-वाईट अनुभव येत असतात. अनेक कलाकारांना रंगामुळेही भेदभावाला सामारं जावं लागतं.   एखादी व्यक्ती कितीही कौशल्यवान असली तरी रंग-रुप जास्त महत्त्वाचं मानलं जातं, टॅलेंट असूनही रंगामुळे डावललं जातं, अनेकदा हा प्रकार घडतो.अशातच मराठीसह बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटवणाऱ्या एका मराठमोळ्या अभिनेत्रीने इंडस्ट्रीतील भयाण वास्तव मांडलं आहे. या अभिनेत्रीचं नाव  मंजिरी पुपाला आहे.

'धडक २', 'सुपरबॉईज ऑफ मालेगाव' यांसारख्या चित्रपटांमधून काम करत मंजिरी पपूला प्रसिद्धीझोतात आली.  'दिल दोस्ती दुनियादारी' या मालिकेतही तिने काम केलं आहे.छोट्या पडद्यापासून सुरुवात करणाऱ्या मंजिरीने आज लोकप्रियतेचे शिखर गाठलं. एका मुलाखतीमध्ये या अभिनेत्रीने इंडस्ट्रीत तिला वर्णभेदाचा सामना करावा लागला, असं भाष्य केलं आहे.सावळ्या रंगामुळे आपल्या वाट्याला कायम मोलकरणीच्या भूमिका आल्या असंही तिने या मुलाखतीत सांगतिलं. NBT ला दिलेल्या मुलाखतीमध्ये अभिनेत्री म्हणाली,"माझ्या डोक्यात कायम एकच विचार असायचा की, मी नाटकात काम करु शकेन. मात्र, मला कधीच कॅमेरासमोर काम करणं जमणार नाही. सावळ्या रंगामुळे माझ्या मनात न्युनगंड निर्माण झाला होता.  "

पुढे अभिनेत्री म्हणाली, "केवळ गोरा रंग असणं म्हणजे खरं सौंदर्य. लहानपणापासून याच गोष्टी आपल्या मनावर बिंबवण्यात आल्या आहेत. मात्र, सावळ्या रंगामुळे मी कधीच कॅमेरा फेस करू शकत नाही,असंच मला वाटत होतं. त्यामुळे ऑडिशन देण्यासाठी मला अडचणी यायच्या. जेव्हा एखाद्या मोठं पात्र साकारण्याची संधी मिळाली तर त्यासाठी गोरा रंग असलेल्यांना कास्ट केलं जायचं. ही त्यांची डिमांड असायची.त्यामुळे मी त्यासाठी ऑडिशन देताना मनात शंका असायची.काही वेळा तर रिजेक्ट केलं जायचं"

मोलकरणीच्या भूमिकाच ऑफर झाल्या...

याविषयी बोलताना अभिनेत्रीने  म्हटलं, "त्याचक्षणी मी ठरवलं, मी माझ्या रंगामुळे एखाद्या भूमिकेसाठी माझी निवड झाली तर निदान ती भूमिका चांगली असावी.कित्येकदा माझ्यासोबत असं झालं, लीड रोलसाठी ऑडिशन देण्यासाठी गेले आणि मला मोलकरणीच्या भूमिकाच ऑफर झाल्या".असा खुलासा अभिनेत्रीने केला होता. त्याचदरम्यान, मंजिरीने सांगितलं होतं की, बरीच वर्ष हे असंच सुरु होतं. मात्र, ओटीटी आल्यानंतर हे चित्र बदललं. 

टॅग्स :मंजिरी पुपालाबॉलिवूडसेलिब्रिटी