काहीच दिवसांपूर्वी रिलीज झालेला 'सैयारा' सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला. 'सैयारा' सिनेमाला प्रेक्षकांचं चांगलंच प्रेम मिळालं. सिनेमातील मुख्य कलाकारांना प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतलं. 'सैयारा' सिनेमा रिलीज होताच अनेक तरुण-तरुणी सिनेमा पाहून रडत असल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. अशातच 'सैयारा' सिनेमातील डिलीट झालेला सीन सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
'सैयारा' सिनेमातील डिलीट झालेला सीन
सोशल मीडियावर 'सैयारा' सिनेमातील एक सीन व्हायरल झाला आहे. या सीनमध्ये सिनेमातील वाणी बत्रा अल्झायमरच्या आजाराने ग्रस्त असते. यामुळेच ती मनाली सोडून निघून जाते. त्यानंतर अलीबागच्या घरात बसून क्रिश कपूर तिची आठवण काढतो. त्यावेळी मनालीच्या गल्ल्यांमध्ये वाणी फिरताना दिसते. तिच्या चेहऱ्यावर काळजी असते. हा सीन प्रचंड इमोशनल असून 'सैयारा'च्या फायनल कटमध्ये हा सीन कट करण्यात आला. या सीनचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ते पाहून 'सैयारा'च्या फायनल कटमध्ये हा सीन ठेवायला पाहिजे होता, अशी चाहत्यांनी मागणी केली आहे.
याशिवाय 'सैयारा'चं अनकट वर्जन रिलीज करावं, अशी मागणी करण्यात आली आहे. चांगला अभिनय करत असूनही अनित पड्डाचे सीन्स कापण्यात आले, असा आरोप 'सैयारा'च्या मेकर्सवर करण्यात आला आहे. 'सैयारा' जेव्हा नेटफ्लिक्सवर रिलीज होईल तेव्हा सिनेमाचं अनकट वर्जन रिलीज करा, आम्हाला कोणतेही कट नसलेला 'सैयारा' पाहायचा आहे, अशी मागणी नेटकऱ्यांनी केली आहे. आता लोकांच्या विनंतीचा मान ठेऊन दिग्दर्शक मोहित सुरी आणि निर्माते यशराज फिल्मस 'सैयारा'चं अनकट वर्जन रिलीज करणार का, याची सर्वांना उत्सुकता आहे.