बॉलिवूडच्या सर्वाधिक चर्चित कपल्सपैकी एक दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग आज गुरुवारी सिंधी पद्धतीने विवाहबद्ध होत आहेत. काल बुधवारी त्यांनी कोंकणी पद्धतीने विवाह केला आणि दोघेही पती-पत्नीच्या पवित्र नात्यात अडकले. कालपासून दीपवीरवर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. चाहत्यांपासून करण जोहर, निमरत कौर, कपिल शर्मा यांनीही आपल्या खास अंदाजात दीपवीरला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पण बॉलिवूडचा किंगखान मात्र या जोडप्याच्या लग्नामुळे थोडा हिरमुसला आहे.होय, विश्वास बसत नसेल तर खालची पोस्ट तुम्ही पाहायलाचं हवी. होय, किंगखान शाहरूखचा ‘झिरो’ हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहांत प्रदर्शित होतोय. या चित्रपटात शाहरूख बऊआ सिंहचे पात्र साकारतोय. या बऊआ सिंहचेही एक ट्विटर अकाऊंट उघडण्यात आले आहे. या अकाऊंटवरून शाहरुख बऊआ सिंह बनून चाहत्यांशी संवाद साधतोय. याच अकाऊंटवरून शाहरुखने पहिल्यांदा दीपवीरच्या लग्नाबद्दल बोलला. होय, शाहरुख उर्फ बऊआ सिंह असा काही बोलला की,रणवीर व दीपिका यांनाही धक्का बसेल.
Deepika Ranveer Wedding: दीपिकाच्या लग्नामुळे हिरमुसला ‘बऊआ सिंह’! गमती-गमतीत बोलून गेला असे काही!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2018 13:18 IST
कालपासून दीपवीरवर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. चाहत्यांपासून करण जोहर, निमरत कौर, कपिल शर्मा यांनीही आपल्या खास अंदाजात दीपवीरला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पण बॉलिवूडचा किंगखान मात्र या जोडप्याच्या लग्नामुळे थोडा हिरमुसला आहे.
Deepika Ranveer Wedding: दीपिकाच्या लग्नामुळे हिरमुसला ‘बऊआ सिंह’! गमती-गमतीत बोलून गेला असे काही!!
ठळक मुद्दे किंगखान शाहरूखचा ‘झिरो’ हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहांत प्रदर्शित होतोय. या चित्रपटात शाहरूख बऊआ सिंहचे पात्र साकारतोय. या बऊआ सिंहचेही एक ट्विटर अकाऊंट उघडण्यात आले आहे.बऊआ सिंह असा काही बोलला की,रणवीर व दीपिका यांनाही धक्का बसेल.