Join us

मादाम तुसादमध्ये दीपिका पादुकोणचा पुतळा! रणवीर सिंग झाला क्रेजी, बहीण म्हणाली, ‘डबल ट्रबल’!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2019 13:15 IST

यशस्वी अभिनेत्रींच्या यादीत सर्वोच्च स्थानी असलेल्या दीपिकाने केवळ बॉलिवूडच गाजवले नाही तर हॉलिवूडमध्येही तिने आपली छाप सोडली. तिची हीच लोकप्रियता पाहून लंडनच्या जगप्रसिद्ध मादाम तुसाद संग्रहालयात दीपिकासारखा हुबेहुब दिसणारा मेणाचा पुतळा उभारण्यात आला.

ठळक मुद्देजगप्रसिद्ध मादाम तुसाद संग्रहालयात दीपिकाच्या मेणाच्या पुतळ्याचे अनावर हा संपूर्ण कुटुंबासाठी अभिमानाचा क्षण ठरला. या अनावरणाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ दीपिकाने शेअर केले आहेत.

सौंदर्य आणि अभिनय यांचा सुंदर मिलाफ असलेली अभिनेत्री म्हणजे दीपिका पादुकोण. यशस्वी अभिनेत्रींच्या यादीत सर्वोच्च स्थानी असलेल्या दीपिकाने केवळ बॉलिवूडच गाजवले नाही तर हॉलिवूडमध्येही तिने आपली छाप सोडली. तिची हीच लोकप्रियता पाहून लंडनच्या जगप्रसिद्ध मादाम तुसाद संग्रहालयात दीपिकासारखा हुबेहुब दिसणारा मेणाचा पुतळा उभारण्यात आला. दीपिकाने अलीकडे या पुतळ्याचे अनावरण केले. यावेळी दीपिकाचे आई-वडिल शिवाय पती रणवीर सिंग हाही तिच्यासोबत होता.

रणवीरने डिपीचा हा मेणाचा पुतळा पाहिला आणि तो त्या पुतळ्याच्याही प्रेमात पडला. मी हा मेणाचा पुतळा घरी घेऊन जाऊ, असे विचारत त्याने दीपिकाच्या या पुतळ्याचे हलकेच चुंबन घेण्याचाही प्रयत्न केला.

 दीपिकाची बहीण अनिशा हिने  हा बहिणीचा हा मेणाचा पुतळा पाहून चांगलीच मजेशीर प्रतिक्रिया दिली. ही एक पुरेशी नव्हती म्हणून आता हा पुतळा...डबल ट्रबल..., असे तिने लिहिले.  

दीपिकाची आई उज्ज्वला पादुकोण यांची प्रतिक्रिया विचाराल तर लेकीचा हा पुतळा पाहून त्या गदगद झालेल्या दिसल्या. ३५ वर्षांपूर्वी लंडनच्या मादाम तुसाद संग्रहालयाला आम्ही भेट दिली होती. ३५ वर्षांनंतर याच जगप्रसिद्ध संग्रहालयात माझ्या मुलीचा पुतळा असेल, ही कल्पनाही मी केली नव्हती, असे त्या म्हणाल्या.

एकंदर काय तर जगप्रसिद्ध मादाम तुसाद संग्रहालयात दीपिकाच्या मेणाच्या पुतळ्याचे अनावर हा संपूर्ण कुटुंबासाठी अभिमानाचा क्षण ठरला. या अनावरणाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ दीपिकाने शेअर केले आहेत. दीपिकाने आयफा अवार्ड्स २०१६ मध्ये जो लाचा घातला होता, त्याच लाचात तिचा हा मेणाचा पुतळा उभारण्यात आला आहे. 

टॅग्स :दीपिका पादुकोणरणवीर सिंग