'कल्की 2898 एडी'(Kalki 2898 AD)च्या सीक्वलबद्दल एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. दीपिका पादुकोण (Deepika Padukone) सीक्वलचा भाग असणार नाही. तिने हा चित्रपट सोडला आहे. चित्रपटाच्या प्रॉडक्शन हाऊसने याची घोषणा केली आहे. यासोबतच निर्मात्यांनी दीपिकाने चित्रपट सोडण्यामागचं कारणही सांगितलं आहे.
नाग अश्विन दिग्दर्शित 'कल्की 2898 एडी'च्या प्रॉडक्शन हाऊस 'विजयंती मूव्हीज'ने 'एक्स' अकाउंटवर पोस्टमध्ये सांगितलं की, 'कल्की'सारख्या प्रोजेक्टसाठी कमिटमेंटव्यतिरिक्त आणखी काही गोष्टींची गरज आहे. 'कल्की 2898 एडी'मध्ये दीपिकाच्या विरुद्ध प्रभास होता आणि त्यांच्या केमिस्ट्रीला खूप पसंती मिळाली होती. त्यामुळेच चाहते सीक्वलमध्येही ही जोडी पाहण्यासाठी उत्सुक होते. पण आता दीपिकाने चित्रपट सोडल्यामुळे चाहते निराश झाले आहेत.
दीपिकाने चित्रपट सोडण्यामागचं कारण आलं समोर
१८ सप्टेंबर रोजी विजयंती मूव्हीजने एक ट्विट करून घोषणा केली की, दीपिका पादुकोण 'कल्की 2898 एडी'च्या दुसऱ्या भागाचा भाग असणार नाही. त्यांनी लिहिलं की, "आम्ही अधिकृतपणे घोषणा करत आहोत की दीपिका पादुकोण 'कल्की 2898 एडी'च्या सीक्वलचा भाग असणार नाही. खूप विचार-विनिमयानंतर, आम्ही वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. पहिला चित्रपट बनवण्याच्या प्रदीर्घ प्रवासानंतरही, आम्ही पार्टनरशीप करू शकलो नाही आणि 'कल्की' सारख्या चित्रपटाला कमिटमेंट आणि इतर गोष्टी योग्य वाटतात. आम्ही तिच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो."
दीपिकाने यापूर्वी 'स्पिरिट'मधून घेतली एक्झिटयाच वर्षी दीपिकाने संदीप रेड्डी वांगाचा चित्रपट 'स्पिरिट' देखील सोडला होता. रिपोर्ट्सनुसार, दीपिकाने संदीप रेड्डी वांगासमोर काही मागण्या ठेवल्या होत्या, ज्यापैकी एक ८ तासांच्या शिफ्टबद्दल होती. संदीपने म्हटलं होतं की, दीपिकाने 'अनप्रोफेशनल' मागण्या केल्या होत्या. यावर वाद झाला आणि दीपिकाने चित्रपट सोडला. आता दीपिका 'कल्की'मधूनही बाहेर पडली आहे. काही महिन्यांपूर्वी अशी बातमी आली होती की, दीपिकाने 'कल्की २' मध्येही कमी तास काम करण्याची मागणी केली होती, आणि त्याच कारणामुळे तिने चित्रपट सोडला. पण आता याची पुष्टी झाली आहे.