Join us

दीपिकाचा एक्स बॉयफ्रेन्ड निहार पांड्या ‘या’ गायिकेसोबत बांधणार लग्नगाठ!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2019 14:41 IST

नव्या वर्षातही अनेक सेलिब्रिटी लग्नबंधनात अडकणार आहेत. होय, या यादीत दीपिका पादुकोणचा एक्स बॉयफ्रेन्ड निहार पांड्या याचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे.

ठळक मुद्देरणवीर सिंग  आयुष्यात येण्यापूर्वी दीपिका अभिनेता रणबीर कपूरसोबत  रिलेशनशिपमध्ये होती. रणबीर हेच दीपिकाचे पहिले प्रेम आहे, असे अनेकांना वाटते. पण असे नाहीच. रणबीर कपूर नव्हे तर निहार पंड्या हे दीपिकाचे पहिले प्रेम होते. दीपिका निहारसोबत लिव्ह इन रिलेशनशिपम

बॉलिवूडमध्ये अनुष्का शर्माच्या लग्नानंतर सुरु झालेले ‘वेडिंग सीझन’ तूर्तास तरी थांबण्याची चिन्हे नाहीत. होय, गतवर्षी दीपिका पादुकोण व प्रियांका चोप्रासारख्या नट्या लग्नबंधनात अडकल्या. नव्या वर्षातही अनेक सेलिब्रिटी लग्नबंधनात अडकणार आहेत. होय, या यादीत दीपिका पादुकोणचा एक्स बॉयफ्रेन्ड निहार पांड्या याचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे. होय, चर्चा खरी मानाल तर येत्या फेब्रुवारीत निहार पांड्या बॉलिवूड सिंगर नीति मोहनसोबत लग्नगाठ बांधणार आहे. 

निहार व नीति दोघेही दीर्घकाळापासून एकमेकांना डेट करत आहेत. मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार, आता हे कपल लग्नाच्या निर्णयापर्यंत आले आहे. सूत्रांचे मानाल तर, निहार व नीति यांनी जाणीवपूर्वक लग्नाची बातमी दडवून ठेवली आहे. आपले लग्न एक खासगी सोहळा असावा, अशी दोघांची इच्छा आहे. पण येत्या फेबु्रवारीत हे कपल लग्नबंधनात अडकणार, हे पक्के मानले जात आहे.

निहार पांड्या लवकरच बॉलिवूड डेब्यू करतोय. कंगना राणौतचा ‘मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी’ हा चित्रपट निहारचा डेब्यू सिनेमा आहे. नीतिबद्दल सांगायचे तर ती बॉलिवूडची एक आघाडीची गायिका आहे. जब तक है जान, सोनू के टीटू की स्वीटी अशा सुपरहिट चित्रपटांसाठी तिने गायले आहे.

रणवीर सिंग  आयुष्यात येण्यापूर्वी दीपिका अभिनेता रणबीर कपूरसोबत  रिलेशनशिपमध्ये होती. रणबीर हेच दीपिकाचे पहिले प्रेम आहे, असे अनेकांना वाटते. पण असे नाहीच. रणबीर कपूर नव्हे तर निहार पंड्या हे दीपिकाचे पहिले प्रेम होते. दीपिका निहारसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्येही होती, अशीही चर्चा होती. दोघांची भेट एका अ‍ॅक्टिंग स्कूलमध्ये झाली होती आणि तेथूनच दोघांमध्ये प्रेम बहरले. त्यावेळी दीपिका मॉडेलिंग करत होती आणि बॉलिवूडमध्येही तिचा संघर्ष सुरु होता. यादरम्यान दीपिका व निहार तीन वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिले. पण तीन वर्षांच्या अफेअरनंतर दोघांचे ब्रेकअप झाले.

टॅग्स :निहार पांड्यादीपिका पादुकोण