Join us
Daily Top 2Weekly Top 5

'ही' बॉलिवूड अभिनेत्री ठरली जगातील सुंदर महिला, फॉर्ब्सच्या यादीत पटकावलं स्थान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2019 11:56 IST

फोर्ब्स इंडियाने नुकतीच 100 ग्लॅमरस आणि सुंदर सेलिब्रेटींची लिस्ट जाहीर केली आहे. या लिस्टमध्ये टॉपच्या 5 अभिनेत्रींमध्ये तिचं नाव सामील आहे

फोर्ब्स इंडियाने नुकतीच 100 ग्लॅमरस आणि सुंदर सेलिब्रेटींची लिस्ट जाहीर केली आहे. या लिस्टमध्ये टॉपच्या 5 अभिनेत्रींपैकी ती एक नाव आहे.  दीपिका पादुकोण ही बॉलिवूडमधील महागड्या अभिनेत्रींपैकी आहे. दीपिकाने 'वर्ल्ड मोस्ट गॉर्जिअस वूमन 2019'चा किताब आपल्या नावावर केला आहे.

नुकतीच दीपिकाने 'छपाक'ची शूटिंग पूर्ण केली आहे. दीपिका पादुकोण छपाक चित्रपटातून निर्मिती क्षेत्रात पदार्पण करते आहे. या चित्रपटात अॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या लक्ष्मी अग्रवाल हिच्या संघर्षाची आणि खडतर प्रवासाची कथा रेखाटण्यात आली आहे.

यात लक्ष्मीच्या भूमिकेत दीपिका पादुकोण दिसणार आहे. तर विक्रांत लक्ष्मीचा लिव्ह इन पार्टनर आलोक दीक्षितच्या भूमिकेत पहायला मिळणार आहे.

विक्रांत आणि दीपिकाची केमिस्ट्री रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांना कितपत भावते, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे. सध्या या चित्रपटाचे शूटिंग सुरू असून हा सिनेमा १० जानेवारी २०२०ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

याशिवाय दीपिका पती रणवीर सिंगसोबत '८३'मध्ये लग्नानंतर पहिल्यांदा स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. '८३' हा सिनेमा भारतीय विश्वचषक विजयाची कथा सांगणारा असून १९८३ मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट टीमने विश्वचषक जिंकला होता.

सध्या या सिनेमाची टीम लंडनला शूटिंग करतेय. यात कपिल देव यांची भूमिका रणवीर सिंग साकारणार आहे.     

टॅग्स :दीपिका पादुकोणरणवीर सिंग